रमेश गंगासागरे
    
      महाराष्ट्र शासन आदिवासी विभाग मंत्रालय दिनांक ९ सप्टेंबर 2020 रोजी राज्यात उद्भवलेल्या कोरोणा विषाणूच्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या कोळी ढोर किंवा टोकरे कोळी, डोंगर कोळी किंवा कोळी महादेव, कोळी मल्हार, ठाकूर, भिल्ल, पारधी अशा ४७ आदिवासी जमातीच्या कुटुंबियांना करण्यासाठी खावटी अनुदान योजना  २०२०-२१ वर्षासाठी सुरू करण्यात आली आहे. शेतकरी, आर्थिक दृष्ट्या दुर्बल या लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे. कोरोना महामारी चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशामध्ये लोक डाऊन लागू करण्यात आले आहे. लॉक डाऊन मुळे कामे बंद असल्यामुळे रोजगारीचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
       खावटी अनुदान योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना रुपये ४००० प्रति कुटुंब अनुदान मिळणार आहे. ज्यामध्ये 2000 किमतीचे वस्तू स्वरूपात वाटप व २००० एवढी रक्कम त्यांच्या बँक/डाक खात्यात जमा होणार आहे. तरी आपल्याकडे आदिवासी आश्रम शाळेचे शिक्षक नाव नोंदणी करण्यासाठी येतील व नंतर फार्म भरून घेतील. तरी सर्व गरजू आदिवासींनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मोतीलाल सोनवणे यांनी केले आहे.
        इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा