भोकर : रमेश गंगासागरे
पदवीधर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण हे आज दिनांक 5 ऑक्टोंबर रोज सोमवारी संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान भोकर येथील ज्येष्ठ विधिज्ञ शिवाजी कदम यांच्या राहत्या घरी भेट दिली, यावेळी आमदार सतीश चव्हाण येणार असल्याचे कळताच अनेक पदवीधर मतदारसंघातील युवकांनी त्यांना प्रत्यक्ष भेट घेतली तसेच पदवीधर मतदार संघातील अडचणीवर त्यांनी युवकां सोबत मनमोकळ्या गप्पाही केल्या,
आमदार सतीश चव्हाण यांनी निवडून आल्यानंतर अनेक ग्रंथालयांना भरीव असा निधी उपलब्ध करून दिल्याने अनेक युवकांना ग्रंथालयातील अनेक पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध झाली आहेत, असे ते यावेळी म्हणाले, प्रथम छोटेखानी कार्यक्रमात आमदार सतीश चव्हाण यांचे ॲडव्होकेट शिवाजी कदम यांनी स्वागत केले यावेळी जांभरून जांभरुणकर सर, विक्रम देशमुख तळेगावकर, बालाजी विजापुरे सिनेट सदस्य, सलीम सर, बी ए जाधव सर, सोनारिकर,बिजी जाधव सर, ॲडव्होकेट पेदे, ॲडव्होकेट मोरे, मुनेश्वर सर, कापसे सर, कळवणे सर, निलेश गाडेगावकर, विठ्ठल धोंडगे, यांच्यासह अनेक पदवीधर मतदार संघातील युवक व नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद पाटील यांनी केले, सूत्रसंचालन श्री, राजवाडीकर तर आभार सलीम सर यांनी मानले, तर प्रा.परसराम बाचेवाड रिठेकर यांनी. आमदार सतीश चव्हाण आणि पदवीधर मतदारसंघातील युवकांची भेट व्हावी यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा
0 Comments