भोकर : रमेश गंगासागरे

     भोकर ते मैसा जाणाऱ्या रोडवर सध्या रुंदीकरणाचे काम चालू असून ह्या रोडवर के टी आय कंपनीचे वाहन काम करत आहेत सदरील वाहनाचा धक्का लागल्याने भोकर तालुक्यातील कांडली येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याने सदरील कंपनीच्या वाहनचालकांवर भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
       पोलिसांकडून घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक 3 सप्टेंबर रोजी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मयत गणेश गड्ड्यांना राहणार कांडली हे आपली मोटारसायकल क्रमांक एम एच 26 बी बी 28 09 वरून भोकरूहूंन गावाकडे परत जाण्यासाठी निघाले असता, भोकर येथील शास्त्रीनगर भागाजवळ केटीआय कंपनीचे रस्ता रुंदीकरनाचे काम चालू होते, सदरील कामावर अनेक वाहने काम करत होती, त्यातील एका वाहनाचा धक्का मोटारसायकल स्वारस लागल्याने तो जागीच गतप्राण झाला, असल्याने सदरील केटीआय कंपनीच्या वाहनचालकांवर मयताची पत्नी श्रीमती संजीवनी गणेश पेनलोड राहणार कांडली यांनी भोकर ठाण्यात रीतसर फिर्याद दिल्यावरून भोकर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 406 /2020 कलम 279, 304 तसेच भादवी 184 कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
      इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा