बंजारा समाजाचे धर्मगुरू प.पु.बाल ब्रह्मचारी, तपस्वी संत श्री.रामराव महाराज यांचे ८४ व्यावर्षी दिर्घ आजाराने मुंबई येथे दुःखद निधन झाले. 
   बापूंच्या निधनाने एका प्रदिर्घ कालखंडाला पूर्ण विराम मिळाला असून, बंजारा समाजाची कधीही भरून न निघणारी प्रचंड मोठी हाणी झाली आहे. महानायक वसंतरावजी नाईक यांच्या निधनाने बंजारा समाज जेवढा दु:खी व पोरका झाला होता तेवढाच दु:खी व पोरका आज बंजारा समाज बापूंच्या जाण्याने झाला आहे. पोहरा देवीचे मुख्य पुजारी म्हणून बापू तिथे राहत होते, संबंध महाराष्ट्र यासह कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगाना आधी प्रदेशांमध्ये बापूची ख्याती होती बापूंना बंजारा समाजामध्ये तसेच इतर समाजामध्ये मोठा मान होता बंजारा समाजातील कोणतेही महान कार्य करण्याअगोदर नागरिक त्यांचा आशीर्वाद घेऊनच काम करत असत, एवढेच नाही तर अनेक राजकीय मंडळी सुद्धा राजकीय कार्य करण्याअगोदर बापू पुढे नतमस्तक होत असत, बापूने आशीर्वाद देताच अनेकांचे राजकीय भले सुद्धा झाले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा बापू प्रसिद्ध होते, दरवर्षी पोहरादेवी येथे मोठी यात्रा भरत असते या यात्रेच्या निमित्ताने देशभरातून आलेला बंजारा समाज बापूंचा आशीर्वाद घेऊन शुभकार्याला सुरुवात करत असत, आज बापूच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली असून बंजारा समाजाचा आधारवड कोसळला आहे अशा प्रतिक्रिया जनमानसातून प्राप्त होत आहेत. बाप्पू मुंबई येथील एका खासगी दवाखान्यांमध्ये मागील अनेक दिवसांपासून उपचार घेत होते शेवटी ते दिनांक 29 ऑक्टोंबरच्या मध्य रात्री आम्हाला सोडून निघून गेले आहेत. त्यामुळे विदर्भ महाराष्ट्र तेलंगाना आंध्र प्रदेश कर्नाटक आदी  राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, जड अ:तकरणाने भोकर  न्यूज लाईव्ह परिवाराच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
       इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा