भोकर : रमेश गंगासागरे
भोकर येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयात 2आँक्टोबर 2020 रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या अभ्यास केंद्राची स्वतंत्र ईमारत बांधण्यात आली. या ईमारतीचे उदघाटन आँनलाईन पध्दतीने नाशिक वरुन मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु मा. डाँ.ई. वायुनंदन यांच्या सुचने वरुन प्रत्यक्ष संस्थेचे अध्यक्ष माजी मंञी डाँ. माधवराव पाटील किन्हाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मा. कुलगुरू यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देवुन महाविद्यालयासह अभ्यास केंद्राचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष तथा माजी मंञी डाँ. माधवराव पाटील किन्हाळकर हे होते. तर प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव मा. मुरादसाब मांजरमकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डाँ. दिनेश भोंडे, नांदेड विभागीय केंद्राचे वरीष्ठ शैक्षणिक सल्लागार डाँ. बी.के. मोहन, साह्यक कुलसचिव चंद्रकांत पवार आणि डाँ. गजानन मुधोळकर हे उपस्थित होते. या वेळी कुलसचिव डाँ. भोंडे सरांनी दुरशिक्षणामधील मुक्त विद्यापीठाची भुमिका या वर सर्वाशी नाशिकवरुन online संवाद साधला, तर मा. डाँ, बी. के. मोहन आणि चंद्रकांत पवार यांनी मुक्त विद्यापीठाचे अनेक शिक्षणक्रम आणि online परीक्षा विषयी सविस्तर मार्गदर्शन केले आणि अभ्यासकेंद्राच्या नियोजनबध्द कार्यप्रणाली विषयी समाधान व्यक्त करुन नांदेड विभागीय केंद्रातील उपक्रमशिल अभ्यास केंद्र म्हणून गौरव केला.
शेवटी अध्यक्षिय समारोपात डाँ. किन्हाळकर साहेब म्हणाले की, मुक्त विद्यापीठाच्या "ज्ञानगंगा घरोघरी " या बोधवाक्याप्रमाणे, शिक्षणापासुन वंचित राहिलेल्या लोकांना शिक्षणाची गंगा घराघरात नेण्याचे काम आज मुक्त विद्यापीठ करीत आहे. आमच्या भोकर अभ्यासकेंद्र अंतर्गत आजपर्यत 14724 विद्यार्थ्यांनी विविध शिक्षणक्रमा अंतर्गत पदवी संपादन केलेल्या आहेत. याचाच अर्थ भोकर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आमच्या आभ्यास केंद्राचा लाभ होतो आहे ही समाधानाची बाब आहे. सुरवातीला कार्यक्रमाचे प्रस्तावीक अभ्यासकेंद्र प्रमुख तथा प्राचार्य डाँ. पंजाब चव्हाण यांनी केले. तर अभ्यास केंद्राचे केंद्र संयोजक प्रा.राधाकिशन होगे यांनी अभ्यास केंद्राअंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमाची online पीपीटी दाखवुन आभ्यास केंद्राची ओळख सर्वाना करुन दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तंञसाह्यक म्हणुन केंद्र साह्याक प्रल्हाद सुंर्यवशी, महाविद्यालय नँक प्रमुख डाँ. चव्हाण अरविंद, डाँ, नागेश ढोले, प्रा, मुंकूद येगावकर, डाँ. कमल फोले, डाँ. तावडे सचिन, प्रा, हाके पंकजं, आमोल लुंगारे, आनंद कदम, पुपलवाड पांडुरंग , ढवळे चंद्रकांत, नितीन वायाकोळे, बांदे लिंगारेड्डी यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाला डाँ. मुंडे बी, जी., ग्रंथपाल गंगाधर होरके डाँ. माने व्ही. एस. सुभाष पाटील कोळगावकर हे प्रत्यक्ष उपस्थित होते तर. झुम, व युट्युब व्दारे महाराष्ट्रातील अनेक अभ्यास केंद्राचे केंद्रसंयोजक , मुक्त विद्यापीठातील अधिकारीवर्ग, आणि अभ्यास केंद्राचे आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने आँनलाईन पध्दतीने सहभागी झालेले होते.
या आँनलाईन आणि आँफलाईन संयुक्त संपुर्ण कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा. प्रशांत टाके यांनी केले तर शेवटी सर्वाचे आभार केंद्रसंयोजक प्रा.राधाकिशन होगे यांनी मानले.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा.
0 Comments