भोकर : रमेश गंगासागरे

  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका गाळ्याची खोटी कागदपत्रे तयार करून एका नागरिकाच्या ताब्यातून तो गाळा बळकावल्याने कृषि उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापतीसह ईतर चार जणांविरुद्ध भोकर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       पोलिसांकडून मिळालेली थोडक्यात माहिती अशी की, काही वर्षांपूर्वी भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीने फिर्यादी मारोती नारायण पेरेवार यांचा भाऊ तिरुपती यास बाजार समितीचा गाळा क्रमांक 86 हा भाडेतत्त्वावर रीतसर दिलेला असताना काही वर्षांनी  माधव शेषेराव पवार यांनी तिरुपती हे चहाचे दुकान  बंद करून दिवाळी सणानिमित्त आपल्या गावी गेलेले असताना, दुकानाचे कुलूप तोडून अनाधिकृतरित्या दुकानाचा ताबा घेतला व तिरुपती यास तेथे येण्यास मज्जाव केला, तसेच चंद्रमुनी भागोजी सावंत हे मुद्रांक विक्रेते यांनी मुद्रांक पेपर मध्ये असलेल्या तारखेत खाडाखोड करून वरील लोकांना सहकार्य केले व फिर्यादीच्या भावाची संपत्ती हडप करण्याच्या उद्देशाने कट कारस्थान रचून फसवणूक केली तसेच आरोपी क्रमांक एक याने खोटी भाडे चिठ्ठी तयार केली व त्यावर माजी सभापती प्रकाश देशमुख भोसीकर, राजेंद्र रेड्डी राजा रेड्डी अल्लुरवाड आणि अनिल गणपतराव माळवदकर यांनी सह्या केल्या, म्हणून फिर्यादीने न्याय मिळावा यासाठी ॲडव्होकेट सिद्धार्थ कदम यांच्यामार्फत कोर्टात अर्ज सादर केला, कोर्टात दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून झाल्यावर कोर्टाने फिर्यादीची बाजू ग्राह्य धरून भोकरचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्री मुजीब शेख यांनी वरील पाचही आरोपींवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांना आदेशित केले त्यावरून भोकर पोलीसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 402/ 2020 कलम 420, 467, 468, 441 आणि 34 भारतीय दंड विधानाच्या कलम नुसार गुन्हे दाखल केले आहेत. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री कांबळे हे करत आहेत.
     इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेले home वर क्लीक करा.