भोकर : रमेश गंगासागरे
भोकर येथिल प्रफुलनगर भागातील नागरिकांच्या घरावरून वीज वितरण कंपनीची मोठी विजेची लाईन गेली आहे, ती आता धोकादायक स्थितीत असल्याने ती लाईन काढून टाकावी यासाठी येथील नागरिक आता बंडाच्या तयारीत असल्याचे दिसून येते.
40 वर्षांपूर्वी प्रफुलनगर भागात जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे नागरिकांची वस्ती नसल्याने एम. एस.ई.बी.ने मोठी विजेची लाईन टाकली होती, ती आता जीर्ण झाली आहे, तसेच आता प्रफुलनगर भागात मोठी वस्ती वाढही झाली आहे, या भागात हजारो नागरिकांनी रहाण्यासाठी मोठी - मोठी घरे बांधली आहेत, तर काही नागरिक घरे बांधण्याच्या तयारीत आहेत पण, अनेक नागरिकांच्या प्लॉट वरून ही विजेची मोठी लाईन गेल्यामुळे त्यांना घरे बांधन्यास मोठी अडचण जाणवत आहे, त्यामुळे त्यांनी ही लाईन काढून टाकण्याबाबाबद अनेकवेळा समबंधीत वीज वितरण कंपनीस लेखी व तोंडी कळविले आहेत, तसेच या भागातील नगरसेवक, आणि नगरपरिषदेस सुधा कळविले आहे पण अद्याप ही लाईन काढली नसल्याने धोका कायम आहे, त्यामुळे या भागातील नागरिक आता विजवीतरण कंपनी विरोधात आंदोलन करण्याचा तयारीत आहेत, भोकर नगरपरिषदेने ही लाईन काढून टाकण्यासंदर्भात विजवीतरण कंपनीला पैसे पण भरलेले असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत, पण विजवीतरण कंपनी कोण्या नागरिकांचा जीव जाण्याची वाट पहात आहे का? असा सवाल येथिल नागरिक कंपनीला वीच्यारत आहेत.
चार दिवसात काम चालू करणार - ज्यू.इंजि.साखरे
"याबाबद भोकर न्युज लाईव्हचे संपादक रमेश जी.गंगासागरे यांनी वीज वितरण कंपनीचे ज्यू.इंजि. श्री, साखरे यांना प्रत्यक्ष भेटून विचारणा केली असता, ते म्हणाले की, सध्या पावसामुळे लेबर उपलब्ध नसून,4 दिवसात लेबर उपलब्ध करून घेऊन कामास सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे."
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा.
0 Comments