भोकर : रमेश गंगासागरे

      भोकर तालुक्यातील मौजे नागापूर येथे आज दि,15 ऑक्टोबर रोजी सकाळी राष्ट्रीय महिला किसान दिवसानाचे औचित्य साधून येथील सरपंच सौ. पदमाबाई बालाजी शानमवाड यांनी गावातील गरीब मोलमजुरी करणाऱ्या महिला, विधवा महिला व विविध बचत गटातील महिलांचा यावेळी पाण्याचीभांडी व साडीचोळीचे वाटप करून राष्ट्रीय महिला किसानदिन साजरा केला.
       गावातील मारोती मंदिराच्या सभागृहात सकाळी सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.पदमाबाई ह्या होत्या, कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनाने झाली, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भोकर पंचायत समितीच्या तालुका कृषी अधिकारी सौ. छाया देशमुख, कृषी सहाय्यक व्ही. डी. पाटील, आनंद बोईनवाड, विजयानंद भोसले, उपसरपंच सखाराम धात्रक सुदर्शन भुमलवाड, आणि आणि ग्रामपंचायत सदस्य यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद बोईनवाड यांनी केले, उपस्थित बचत गटातील व गरीब मजूर महिलांना भोकर पंचायत समितीच्या तालुका कृषी अधिकारी सौ छाया देशमुख यांनी मार्गदर्शन केले, सदरील कार्यक्रमात 40 विधवा महिलांना उपस्थित प्रमुख पाहुणे व सरपंच पद्माबाई पाटील यांच्या हस्ते साडी-चोळी व पाणी भरण्याचे भांडे देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी गावातील दलित वस्ती मधील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचा मान्यवरांच्या समक्ष लोकार्पण सोहळा ही मोठ्या थाटामाटात पार पडला, शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील यांनी केले, कार्यक्रमास गावातील अनेक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
       इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा