उमरी : रमेश जी.गंगासागरे
उमरी तालुक्यातील मौजे ढोल उमरी येथील एका विवाहितेस सासरच्या मंडळींनी तिला छळून आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे नवरा सासू सासरा व नंद यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा उमरी पोलिस स्थानकामध्ये दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मौजे ढोल उमरी येथील मयत अनिता बोईनवाड तिचा पती, सासू, सासरा व ननंद यांनी तू काळी आहेस तुला स्वयंपाक जमत नाही, म्हणून अतोनात त्रास केला व अनेकदा मारहाण करून तिला उपाशीपोटी करण्यास प्रवृत्त केले तसेच घर बांधकामासाठी माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये म्हणून छळ केला होता, मयत अनिता हिने आपणाला होत असलेला त्रास भोकर तालुक्यातील रिठा हे माहेर असल्यामुळे तिने आपल्या माहेरी सर्व आपबिती सांगितली, त्यामुळे बहिणीचा त्रास कमी व्हावा या उद्देशाने फिर्यादी भाऊ किशन गोपीनाथ यांनी बहिणीला 50 हजार रुपये व एक मैस दिली, त्यानंतरही बहिणीचा छळ काही थांबता थांबेना दिनांक 7 ऑक्टोंबर रोजी रात्री सासरची मंडळी सासरा बळीराम, सासू गोदावरी, नंदन शकुंतला व पती नरसिंगा यांनी मारहाण केल्यामुळे अनिताने त्याच रात्री गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली दिनांक 8 ऑक्टोंबर रोजी मयत अनिता हिचा भाऊ किशन गोपीनाथ बोईनवाड यांनी उमरी पोलिस स्थानकामध्ये रितसर फिर्याद दिल्यावरून उमरी पोलिसांनी पती, सासरा, सासू व नंदन यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे मयत अनिता हिस तीन अपत्य असून 5 वर्षाची मुलगी दुसरी 3 वर्षाची मुलगी व छोटा 6 महिन्याचा मुलगा असल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा
0 Comments