भोकर : रमेश गंगासागरे

        दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाच्या प्रारंभीच्या जडणघडणीत वरिष्ट लिपीक श्री अशोक कदम यांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा बिंदू महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. माधवराव किन्हाळकर यांनी केले .
     यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव मुराद मांजरंमकर, व्हिव्हीके उद्योग समुहाचे उद्योजक मारोतराव कवळे, प्राचार्य डॉ.पंजाब चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर पाटील लगळुदकर, सुभाष पाटील कोळगावकर, सुभाष पाटील किन्हाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोतांना डॉ . किन्हाळकर म्हणाले की, बिंदू महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपीक अशोक कदम लगळुदकर यांनी ३१ व्या वर्षी सेवानिवृत्त झाल्यानंतर यांचा गौरव करण्यासाठी कॉलेजच्या वतीने आज दि.१ ऑक्टोंबर रोजी स्वा. से. कै.भुजंगराव पाटील किन्हाळकर सभागृहात भव्य सत्कार व निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी सेवानिवृत कदम यांचा आहेर, सन्मानचिन्ह, पाच ग्राम सोन्याची अंगठी, शाल, श्रीफळ देऊन महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना किन्हाळकर म्हणाले अशोक कदम यांनी महाविद्यालयाच्या सुरुवातीपासून सेवानिवृत्तीपर्यंत संस्थेमध्ये उल्लेखनिय सेवा केली . प्रत्येक क्षेत्रात मानसांनी असे कार्य केले पाहीजे की, त्या कार्याची इतरांनी कायम आठवन ठेऊन प्रेरणा घेतली पाहीजे . उर्वरीत पुढील आयुष्यात अशोकराव यांनी त्यांच्या बुद्धी कौशल्याचा उपयोग इतरांच्या उपयोगासाठी करावा म्हणून शुभेच्छा दिल्या. अशोकराव कदम यांनी सत्काराला उत्तर देताना संस्थेच्या हितासाठी स्पष्टपणे बोलत होतो, मी कायम संस्थेच्या ऋणात राहील याची कबुली दिली. प्राचार्य पंजाब चव्हाण, प्रा.डॉ.जे.टी. जाधव, प्रा . मुंडे यांनी कदम यांच्या कार्याची प्रशंसा करून शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार बांधवांच्या वतीनेही सत्कार करन्यात आला. प्रास्ताविक प्रा.डॉ.व्ही.एस. माने यांनी केले, तर सुत्रसंचालन व आभार व्यंकट ढवळे यांनी मानले.
       इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा