भोकर : रमेश गंगासागरे
आपल्या देशात व उत्तर प्रदेशात अनुसूचित जाती-जमातीच्या मागासवर्गीय महिला व मुली वर अन्याय अत्याचार होत आहेत परवाच उत्तर प्रदेश येथील मनीषा वाल्मिकी या 19 वर्षीय तरूणीवर बलात्कार व अत्याचार करून तिची जीभ छाटण्यात आली, तसेच तिला बेदम मारहाण केल्यामुळे तिचा मृत्यू झाला, तसेच दुसऱ्या एका घटनेत 22 वर्षीय तरुणीवर ह्याच पद्धतीने बलात्कार करून ठार करण्यात आले आहे, दिवसेंदिवस भारतामध्ये विशेषकरून उत्तर प्रदेशामध्ये मागासवर्गीय महिलांवर अन्याय अत्याचार व बलात्कार होत असल्यामुळे अशा नराधमांना कठोरात कठोर व फाशीची शिक्षा करावी या मागणीसाठी भोकर येथील वंचित बहुजन आघाडी, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद, आदिवासी विकास संघटना, लोकस्वराज्य आंदोलन, मराठा साम्राज्य संघ, प्रहार जनशक्ती तसेच ऑल इंडिया पॅंथर सेना यांच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान यांना लेखी निवेदन पाठविण्यात आले असून निवेदनावर,वंचित बहूजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुनिल कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एल. ए. हिरे, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे तालुकाध्यक्ष रमेश गंगासागरे, आदिवासी विकास संघटनेचे विजय मोरे, लोकस्वराज्य आंदोलनाचे बाळासाहेब टिकेकर, लक्ष्मण सुरवेशकर, मराठा साम्राज्यचे अजय देशमुख, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे निखील हंकारे, प्रहार जनशक्तीचे दत्ताभाऊ शिरळवार, लक्ष्मण सुरवेशकर, संतोष अनेराये, नितेश चौधरी, राहुल नक्कलवाड, पांडुरंग बिडवई आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा.
0 Comments