भोकर : रमेश गंगासागरे

      भाजीपाला, फळ विक्रेते व फेरीवाल्यां नागरिकांनी भोकर नगर परिषदेमध्ये जाऊन पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष मन्सूर खान पठाण यांनी केले आहे.
       सध्या भोकर नगर परिषद हद्दीमध्ये 80 ते 90 फेरीवाले फळविक्रेते तसेच दीडशे ते दोनशे भाजीपाला विक्रेते असून ह्या सर्वांनी भारत सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजनेचा या सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान भाजीपाला व फळ विक्रेते संघटनेचे अध्यक्ष मंसूर खान पठाण कोळगावकर यांनी केले आहे. सदरील आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत भाजीपाला व फळ विक्रेत्यांना विविध स्वरूपाच्या सोयी सुविधा मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
       इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा