हिमायतनगर : रमेश गंगासागरे
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी श्री अशोक भोजराज तवर रा.बोरगाव ता.हिमायतनगर यांनी त्यांचा नातू नामे नमन उर्फ शिवप्रसाद संदीप तवर यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी (अज्ञात विषारी औषधाचा प्रयोग करून खून)
त्यांची सून कांताबाई पि.दत्ताराव सूर्यवंशी व त्यांच्या कुटुंबांमधील इतर चार जणांविरुद्ध (रा.सर्व खडकी बाजार ता.हिमायतनगर) हिमायतनगर न्यायालयांमध्ये फौजदारी दंड संहिता 156(3) अन्वये दाखल केलेल्या याचिकेमध्ये सन्माननीय हिमायतनगर न्यायालयाने सौ.कांताबाई भ्र.संदीप पवार, शांताबाई दत्तराव सूर्यवंशी, दत्तराव देवराव सूर्यवंशी, देवराव सूर्यभान सूर्यवंशी व ममता दत्तराव सूर्यवंशी यांच्या विरुद्ध कलम 202, 302, 34 भा.द.वि प्रमाणे हत्येचा गुन्हा दाखल करण्याचा पोलीस स्टेशन हिमायतनगर यांना दिनांक 28-सप्टेंबर-2020 रोजी आदेश दिला होता, त्याप्रमाणे हिमायतनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा. रजि. न. 203/2020 गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदर प्रकरणात फिर्यादी तर्फे श्री, अँड.विक्रमराजे शिंदे, व अँड.शेखर सतीशराव कुंटे (सरसमकर) यांनी काम पाहिले.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा
0 Comments