भोकर : रमेश गंगासागरे

    दिनांक २१/०९/ २०२० रोजी यातील तकारदार यांनी तक्ार दिली की, "यातील लोकसेवक नागोराव गोविंदराव आत्राम हे तकारदार यांचे विरूध्द पो. स्टे. भोकर येथे दाखल.

        गुन्हयात सदर गुन्हयाचे तपासीक अधिकारी यांचेकडून तपासात मदत मिळवून देणे म्हणून १५,०००/- रु. लाचेची मागणी करीत आहेत". तकारदार यांचे तकारीच्या अनुषंगाने लाचलुचत प्रतिबंधक विभाग, नांदेड कार्यालयाकडुन दिनांक २२/०९/२०२० रोजी पंचासमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये लोकसेवक नागोराव गोविंद आत्राम यांनी तकारदार त्यांचे विरूध्द पो.स्टे. भोकर येथे दाखल असलेल्या गुन्हयाचे तपासात मदत मिळवून देण्याकरीता १५,०००/- रू. लाचेची मागणी करून लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले म्हणुन त्यांचे विरूध्द पोलीस ठाणे भोकर येथे गु.र.नं. ३९८/ २०२० कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक
अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करून तपस पोलीस निरीक्षक श्री राजेश पुरी प्रतिबंधक विभाग, नांदेड हे करीत आहेत. सदरची सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक श्रीमती कल्पना बारवकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पोलीस उप अधिक्षक श्री. विजय डोंगरे, यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक राजेश पुरी पोहेका संतोष शेटे, पोना एकनाथ गंगातिथ पोना दर्शन यादव, पोना अनिल कदम यांनी पार पाडली आहे.

इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा