भोकर : रमेश गंगासागरे 
      दरवर्षी जून महिन्यात सुरू होणारी शाळा, कॉलेज सप्टेंबर महिना संपत आला तरीही कोरोना काळ  चालू असल्यामुळे  सर्व काही बंद आहेत, त्यामुळे  विद्यार्थी आणि शिक्षकांची भेट होणे दुर्मिळ झाले आहे, पण शाहू विद्यालयाचे प्राचार्य श्री संजय देशमुख कामंनगावकर  यांच्या अफलातून  कल्पनेने ते शक्य झाले आहे, विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांची नाळ जुडलेली असल्याने त्यांनी थेट विद्यार्थ्यांच्या गावी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेऊन हितगूज करण्याचे ठरविले त्यामुळे कोरोनाच्या परतीच्या प्रवासामध्ये अशा प्रकारे  अफलातून गुरु आणि शिष्य ची भेट घडून आली.
        शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी भोकर तालुक्यातील हाडोळी या गावी त्यांनी काही शालेय विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांच्याशी ऑनलाइन अभ्यासक्रमाबाबतच्या अडीअडचणी काय आहेत यावर खोलवर चर्चा केली, त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या सूचनांचे पालन करत शेकडो विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रमासाठी व्हाट्सअप ग्रुप चे आयोजन केले आणि आता ते व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी वेगळ्या प्रकारे संवाद साधून अभ्यासाविषयी माहितीची आदान-प्रदान करणार आहेत प्राचार्य संजय देशमुख यांच्या अफलातून प्रयोगाची भोकर तालुक्यातील विविध भागात मोठ्या चवीने चर्चा होत आहे, तसेच त्यांच्यावर सोशलमीडियामधून अभिनंदनाचा वर्षाव सुद्धा होत आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्या पूर्वी कोरोणा संबंधीचे सर्व नियम काळजीने पाळण्यात आले होते हे विशेष. 
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा