भोकर : रमेश गंगासागरे
दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या पावसाने शेत शिवाराचे प्रचंड नुकसान केले असून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्यामुळे उभे पीक पूर्णतः नष्ट झाले आहे. अशा नुकसानग्रस्त भागांचा दौरा भोकरचे उपविभागीय अधिकारी श्री राजेंद्र खंदारे यांनी तात्काळ केला आहे.
मागील तीन दिवसांपासून भोकर तालुक्यात होत असलेल्या परतीच्या प्रचंड पावसाने नागरिकांचे व शेतकर्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले असून ह्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे उभे असलेले पीक पूर्णतः खरडून गेल्याचे चित्र भोकर तालुक्यामध्ये दिसत आहे ह्या पावसाचे पाणी अनेक नागरिकांच्या घरातही घुसले असून भोकर ते तामसा हा रोड तीन तास बंद होत असल्याने अनेक वाहतूकदार खोळंबून पडले होते.
भोकर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे आकडेवारी अशी रवी अंदाजे 90 शेतकऱ्यांचे 150 हेक्टरवरील पिकांचे नुकसान आमदार येथील 55 शेतकऱ्यांच्या 78 हेक्टरवरील पिकांचे नुकसान मौजे वाकद येथील 135 शेतकऱ्यांचे 152 हेक्टरवरील नुकसान नारवाल 74 शेतकऱ्यांचे 22 हेक्टरवरील पिकांचे नुकसान धानोरा 98 शेतकऱ्यांचे 29 हेक्टरवरील पिकांचे नुकसान बोरगाव 65 शेतकऱ्यांचे 18 हेक्टरवरील नुकसान एकूण नुकसानग्रस्त पिकाचे क्षेत्रफळ 449 हेक्टर अंदाजे आकडेवारी तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे नुकसानग्रस्त भागाचा तात्काळ पाहणी दौरा भोकरचे उपविभागीय अधिकारी श्री राजेंद्र खंदारे यांनी केला आहे. या दरम्यान त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या.
आज सकाळी मौ. खरबी इथे सकाळी 7 ते 10 दरम्यान मा. श्री. राजेंद्र खंदारे (उपविभागीय अधिकारी भोकर), यांच्यासह मा. श्री. भरत सूर्यवंशी (तहसीलदार भोकर) यांनी स्थळ पाहणी केली. स्थळ पाहणी दरम्यान मंडळ अधिकारी महेश वाकडे, संबंधित गावचे सरपंच मा. श्री. गंगाधर पाशमवाड, तलाठी कु. ज्योती राठोड, कृषी सहायक श्री. अतुल कंचटवार, संबंधित बाधित शेतकरी बांधव उपस्थित होते.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा
0 Comments