भोकर : रमेश गंगासागरे 
       
       शिक्षक सृजन ग्रुप भोकर च्या वतीने काढण्यात आलेल्या मराठवाडा मुक्तीसंग्राम ई-विशेषांक चे आॅनलाईन प्रकाशन उपशिक्षणाधिकारी डॉ डी एस मठपती यांच्या हस्ते संपन्न झाले.
          कोरोना पार्श्वभूमीच्या काळात शिक्षण प्रक्रिया जीवंत ठेऊन विद्यार्थ्यांप्रती उत्तरदायीत्वांच्या जाणिवेतून अखंडित व अविरतपणे शैक्षणिक कार्य करीत असतांना सृजनशील शिक्षक समूहाकडून   ई विशेषांका सारखे उपक्रम घेतल्या जात  आहेत याचा आनंद वाटतो व अशा शिक्षकांमुळे मला आधारही वाटतो. अशा शब्दांत सहभागी शिक्षकांना मार्गदर्शन करत असतांना डॉ.मठपती म्हणाले. नांदेडचे प्रा. शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी ही प्रकाशन सोहळ्यास शुभेच्छा दिल्या. विशेषांकाच्या माध्यमातून नव्या पिढीला स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या बलीदानाचे स्मरण करून देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे अशा शब्दांत व्यंकटेश चौधरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
            भोकर येथील शिक्षक सृजन ग्रुप च्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम ई-विशेषांक काढण्यात आला होता. या विशेषांकात चंदु चक्रवार, मिलिंद जाधव, बालाजी तुमवाड, गंगाधर निमलवार, शंकर गच्चे, पंचकिरण कंधारे, मनोहर गायकवाड, छाया जोशी, लता फुलारी, रेखा कंगठीकर, मनोरमा गोवंदे आदींचे लेख, कविता प्रकाशित करण्यात आले. या ई-विशेषांकांचे आॅनलाईन प्रकाशन उपशिक्षणाधिकारी डॉ डी एस मठपती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षणविस्तार अधिकारी व्यकंटेश चौधरी, पत्रकार विठ्ठल फुलारी, सुरेश दंडवते यांची उपस्थिती होती. 
            या आॅनलाईन प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक मिलिंद जाधव, सुत्रसंचलन बालाजी तुमवाड तर आभार छाया जोशी यांनी मानले.
       इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा