भोकर :रमेश गंगासागरे


       "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या मोहिमेची सुरुवात Online Zoom App द्वारे मुंबई येथून मा.आ. अशोकराव चव्हाण साहेब, पालकमंत्री नांदेड यांनी गंदेवार कॉलनी भोकर येथील श्री, उत्तम जाधव यांच्या घरापासून सदरील मोहिमेचे उद्घाटन आज सकाळी  दि. १५ सप्टेंबर रोजी केले. 
     तसेच या मोहिमेस पालकमंत्री चव्हाण यांनी मार्गदर्शन केले, व  शुभेच्छा दिल्या तसेच सर्व नागरिकांनी या मोहिमेत उत्सपुर्त सहभागी व्हावे व आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य पथकाकडून आपल्या कुटुंबाची कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाय करण्याकरिता तपासणी करावी व शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे असे आवाहन केले आहे.
       यावेळी राजेंद्र खंदारे उपविभागीय अधिकारी, भरत सुर्यवंशी तहसीलदार भोकर, डॉ अशोक मुंडे  वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर, प्रियंका टोंगे मुख्याधिकारी भोकर, विनोद चिंचाळकर प्रतिनिधी नगराध्यक्ष, विशाल चौधरी, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य पर्यवेक्षक , सचिन वैष्णव, पांडुरंग तम्मलवाड तहसील, नगर परिषद व ग्रामीण रुग्णालय येथील कर्मचारी उपस्थित होते.
       या कार्यक्रमानंतर लगेचच भोकर शहरातील प्रत्येक वार्डात जाऊन आरोग्य कर्मचारी अंगणवाडी कार्यकर्ती यांनी नागरिकांची घरोघर जाऊन आरोग्य तपासणी केली, हा कार्यक्रम 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोंबर ह्या दरम्यान होणार असून नागरिकांनी घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यास सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
       इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा