भोकर :- रमेश गंगासागरे

       संपूर्ण भारतामध्ये कोरोना covid-19 ही महामारी पसरल्या मुळे सर्वांना काळजी घेणे गरजेचे झाले आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाची दिनांक 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोंबर यादरम्यान हे अभियान संबंध महाराष्ट्रभर चालवले असल्याने या अभियानाचा एक भाग म्हणून भोकर येथील उपविभागीय अधिकारी श्री राजेंद्र खंदारे यांनी भोकर येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, सचिव, तालुका आरोग्य अधिकारी यांची एक संयुक्त बैठक आयोजित केली होती.

       घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी यांनी नेमलेल्या पथकामध्ये लोकप्रतिनिधींचे दोन व्यक्ती तसेच एक आरोग्य कर्मचारी यांचा समावेश केला असून हे कर्मचारी प्रत्येक गाव वाडी तांडा खेडी येथील व्यक्तींची विचारपूस व चाचण्या करणार असून covid-19 चे लक्षणे आढळून आल्यास अशा रुग्णास त्वरित दवाखान्यामध्ये अधिक चाचण्या करण्यासाठी पाठविण्याची व्यवस्था करणार आहेत तसेच हा आजार इतरस्त्र पसरू नये म्हणून प्रत्येक कुटुंबाने आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेऊन  हे अभियान यशस्वीरित्या पूर्ण करावे, अशा सूचना उपविभागीय अधिकारी श्री राजेंद्र खंदारे यांनी केल्या आहेत.
       १. मोहीम कालावधीमध्ये गृहभेटी देण्यासाठी आरोग्य पथके तयार करावीत. प्रत्येक
जिल्हयास आवश्यक आरोग्य पथकांची संख्या सोबत जोडली आहे. एका पथकामध्ये
१ आरोग्य कर्मचारी आणि २ स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेले स्वयंसेवक असतील.
२. एक पथक दररोज ५० घरांना भेटी देईल. भेटीदरम्यान घरातील सर्व सदस्यांचे
तापमान SpO२ तपासणे तसेच Comorbid Condition आहे का याची माहिती
घेण्यात येईल.
 ३. ताप, खोकला, दम लागणे, Sp०२ कमी अशी कोविडसदृष्य लक्षणे असणाऱ्या
व्यक्तींना जवळच्या Fever Clinic मध्ये संदर्भित करण्यात येईल. Fever Clinic मध्ये
कोवीड-१९ प्रयोगशाळा चाचणी करुन पुढील उपचार केले जातील.
४. कोमॉर्बीड Condition असणारे रुग्ण नियमित उपचार घेतात का याची खात्री केली
जाईल आणि आवश्यक तेथे औषधे व तपासणीत संदर्भित केले जाईल.
५. प्रत्येक ५ ते१० पथकांमागे १ डॉक्टर उपचार व संदर्भसेवा देईल.
६. घरातील सर्व सदस्यांना व्यक्तीशः प्री कोवीड, कोवीड आणि पोस्ट 2/
परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समजावुन सांगितले जातील.
उपरोक्त अनुसार कार्यवाही करण्यासाठी पुढील प्रमाणे नियोजन करण्यात यावेत:-
१) मार्गदर्शक सूचनामध्ये नमुद केल्यानुसार लोकसंख्येनुसार प्रा.आ.केंद्र, शहर/गाव
येथे आरोग्य पथके तयार करुन त्यांना प्रशिक्षण देणे आणि साहित्य वाटप करावे.
२) प्रत्येक ५-१० पथकामागे १ डॉक्टर निश्चित करावा व तसे आदेश निर्गमित करावे.
३) कोमॉर्बीड रुग्णांच्या उपचारासाठी, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार, किडनी
विकार इ. आजारासाठी प्रोटोकॉलनुसार लागणारी औषधींचा साठा प्रा.आ.केंद्र/
रुग्णालय स्तरावर उपलब्ध करावा. साठा करमी असल्यास NHMच्या Free
Medicine निधीतून खरेदी करावी.
४) ताप उपचार केंद्र (Fever Treatment Center) प्रत्येक CCC/CHC/DCH मध्ये
कार्यान्वित करावे. याठिकाणी संदर्भित होणा-या रुग्णांना संशयीत रुग्ण कक्षात
दाखल करुन कोबीड-१९ चाचण्या कराव्यात. प्रत्येक तालुक्यात किमान १ ताप
उपचार केंद्र कार्यरत असणे आवश्यक आहे.
५) आवश्यकतेनुसार व नवीन CCC/CHC/DCH स्थापन करण्यासाठी नियोजन करावे.
६) ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन करावे.
७) संशयीत कोवीड-१९ रुग्णांना कडून FTC मध्ये आणण्यासाठी प्रत्येक २-३
प्रा.आ.केंद्रा मागे किमान १ Ambulance ची सोय करावी.
८) लोकप्रतिनिधी व खाजगी रुग्णालय, स्वयंसेवीका यांचा या मोहीमेसाठी सहभाग घ्यावा
       इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा