भोकर : संदीप गंगासागरे

    उमरी येथील विलास गणपतराव देशमुख यांच्यावर उमरी पोलीस स्टेशन अंतर्गत अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये 17 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला होता, त्या गुन्ह्यात त्यांचा जामीन अर्ज ह्या पूर्वीच भोकर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाल्याने व औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाने फेटाळून लावला  असून त्यांना आज दि,28 रोजी भोकर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडीचा रस्ता दाखविला आहे.
       घटनेबाबत थोडक्यात माहिती अशी की, उमरी येथील एल.आय.सी.एजंट रमेश सुभानजी गंगासागरे  उमरी बसस्थानका शेजारी असलेल्या बोडके पाटील यांच्या  किराणा दुकानात एल.आय.सी.च्या कामानिमित्ताने दि, 17 फेब्रुवारी 2020 रोजी गेले असता, तेथे विकास अधिकारी विलास देशमुख हे, त्या ठिकाणी येऊन एलआयसी एजंट असलेल्या रमेश गंगासागरे यांना जातिवाचक व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून 3 फूट उंच असलेल्या ओट्यावरून  लाथा व बुक्या मारून खाली पाडले व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यावरून त्यांच्यावर उमरी पोलीस ठाण्यात दिनांक 17 फेब्रुवारी 2020 रोजी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये तसेच कलम 323, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला, तेव्हापासून विकास अधिकारी देशमुख हे फरार झाले आहेत, त्यांनी फरार राहून अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनासाठी भोकर येथील श्री एम.एस.शेख यांच्या न्यायालयात वकिलामार्फत अर्ज केला होता, त्या अर्जावर दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली होती न्यायालयाने विकास अधिकारी देशमुख यांना जामीन नाकारून त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता. तेव्हा पासून देशमुख हे भूमिगत राहून औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात जामीन मिळावा यासाठी वकिलामार्फत अर्ज दाखल केला होता, प्रकरण गंभीर असल्याने तेव्हा उच्च न्यायालयानेही त्यांना जामीन नाकारला, म्हणून त्यांना उमरी पोलिसांनी आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी अटक करून भोकर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, जिल्हा न्यायाधीश श्री मुजीब शेख यांनी त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
       

इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा.