भोकर: रमेश गंगासागरे

        ढानकी परिसरातील आखाड्यावर पडलेल्या दरोड्यातील आरोपी हाती लागले असून पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत, दरोड्यातील मुख्य सूत्रधार भोकर, उमरी येथील असल्याचे निष्पन्नन झाले आहे.


       दिनांक 29/08/2020 रोजो पो.स्टे. बिटरगांव हद्दीतील ग्राम ढाणकी ते खरुस रोडवर
असलेल्या संजय जिल्हावार यांचे सेतातील गोठ्यावर 10 ते 15 लोकांनी सायंकाळी 07/30 वा. ते 09/00 वाजण्याच्या सुमारास सदरील आरोपींनी सशस्त्र दरोडा टाकुन तेथे सालदार म्हणून असलेले 02 सालगडी व त्यांचे पत्नी व मुलांना बेदम मारहण
करुन, चाकु व ईतर घातक शस्त्रांचा धाक दाखवून सालगडयांना चाकूने मारहाण करुन सालगडयांचे पत्नी जवळ असलेले सोन्याचे मंगळसुत्र व कानातील फुल असा 20,000 /- रु किमंतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता. सदर गुन्हा करते वेळी गुन्हेगारांनी संजय जिल्हावार यांचे शेतावर असलेल्या नोकरांना,  बायका पोरांना बेधम मारहाण केली होती, तसेच एका सालगडयाला जिवाने मारण्याच्या उद्देशाने विहरीत ढकलुन दिले होते. सदर प्रकरणी फिर्यादी सालगडी नागोराव वामन डहाके याचे फिर्याद वरुन पो.न्टे. बिटरगांव येथे अप.क्र. 200/2020 कलम
395,307,323, 506 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हेगारांच्या या मोठ्या संख्येने येवूत दरोडा टाकण्याच्या व मारहाण करण्याच्या प्रकारामुळे ढाणकी परिसरातील नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्नाण झाले होते, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून आरोपीतांना यवतमळ जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. एम. राज कुमार यांनी सदरचा गुन्हा तात्काळ उधडकीस म्हणून आरोपीताना अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शखेचे पोलीस निरीक्षक, श्री. प्रदिप शिरस्कर यांना दिले होते. त्यावरुन पोनि. स्थागुशा यांनी पो.नि.वक्ष येथील सपोनि संदीप चन्हाण, तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील पोउपनि निलेश शेळके,
पोउपनि श्रीकांत जिंदम्वार यांचे एक पथक तयार करुन सदर पथकासह ढाणकी येथे कॅम्प करुन तपासावर लक्ष केंद्रीत केले होते. स्थानिक गुन्हे शखेकडून गुन्हेगारांचा मागसुस घेण्या कसोशीने प्रयत्न सुरु असतांना काल दिनांक 02/09/2020 रोजी सपोनि संदीप चव्हाण यांना सदर गुन्हयातील गुन्हेगार हे हिमायतनगर जि. नांदेड येथे दबा धरुण असत्याची विश्वसनीय गोपणीय बातमी मिळाली होती, त्यावरुन स्पोनि संदीप चव्हाण, सपोनि विजय
चव्हाण, ठाणेदार पो.स्टे. बिटरगांव तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील पोडपनि शेळके, पोउपनि श्रीकांत जिंदमवार, पोउपनि जायभावे पो.स्टे. बिटरगांव यांचे पथक शासकीय वाहनाने हिमायतनगर येथे रवाना होवून मिळालेल्या गोपणीय माहीतीचे आधारे हिमायतनगर येथे सापळा कारवाई करुन आरोपी 1) विश्वनाथ शंकर शिंदे वय 22 वर्षे, रा. उमरी जि. नांदेड 2) शुभम मुकुंदराव अडाकिणे वय 21 वर्ष, रा. पवार कॉलणी, भोकर जि. नांदेड 3) मणोज उर्फ चंद्रकांत लक्ष्मणराव मनोरवार वय 31 वर्षे, रा. कोळगत्ली भोळर जि. नांदेड 4) विकास किस्न परिमल वय 39
वर्षे, रा. ढाणकी, जि. यवतमाळ 5) रामचंद्र लक्ष्मण सजवाड वय 8 वर्ष, रा. नंदोनगर शिवाजी चौक, भोकर जि. नंदेड 6) सुरज गोतम रावते वय 21 वर्षे, रा. पवना ता. हिमायतनगर जि. नांदेड 7) चंद्रकांत  गोतम साथते व 28 वर्ष, रा. पवना ता. हिनायतनगर जि. नांदेड 8) धम्मदिप नारायन राउत वय 21 चर्ष, रा. पवना ता. हिमायतनगर जि. नांदेड 9) अजय शेकु राउत वय 20 वर्ष, रा. पवना ता. हिमागतनगर नि. नांदेड 10) नितोन उर्फ एक्का नारायन अङूनवार वय 20 वर्षे, रा. रापतवार नगर उमरी ता. हिमायतनगर जि. नांदेड यांना ताब्यात घेवून त्यांचे कडून
गन्हयात वापरलेले वाहन 01 नहीद्रा TUV कार, 01 यामाह मोटारसायकल 01 स्मार्ट स्प्लैंडर मोसा, 01 होन्डा लिओ, चाकु, 01 तलवार, 01, कुशा, 06 मोबाईल व गुन्हयातील चोरी गेला मुद्देमाल 05 ग्राम सोन्याचे दागीने असा एकूण किमंत. 10,23,000/- रु चा मुद्देमाल जप्त केला आहे. नमुद आरोपीतांकडे केलेल्या तपासात ढाणकी येथील स्थानिक आरोपी नामे विकास किसन परिमल याने मागील 02 महिण्यांपूर्वी आरोपी नामे चंद्रकांत गौतम सावते वय 28 वर्षे, रा. पवना ता. हिमायतनगर यास ढाणकी ते खरुस रोड वर असलेल्या संजय जिल्हावार यांचे शेतातील गोठयावर 03 पेटया सोने ठेवले असल्याची टिप दिली होती, त्यावरुन आरेपी चंद्रकांत सावते याने मागील 02 महीण्यांपासून संजय जिल्हावार यांचे गोठयावर पाळत ठेवुन ग्राम पवना, भोकर, उमरी, ई. गावातुन साथीदारांची जुळवा जुळव केली असल्याचे व 03 पेटया सोने मिळेल या लालसेतुन दिनांक 29/08/2020 रोजी सशस्त्र दरोडा टाकला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक, यवतमाळ, श्री. एम. राजकुमार साो. अपर पोलीस अधीक्षक, श्री.नूरूल हसन साो., श्री. बागबान, प्रभारी उपविभागीय पोलीस अधीकारी, उमरखेड यांचे

मागदर्शनाखाली पो.नि. प्रदिप शिरस्कर, स्थागुशा, यवतमाळ, सपोनि संपि चव्हाण पो.नि.कक्ष , यवतमाळ तसेच

पोउपनि निलेश शेळके, पोउपनि, श्रीकांत जिंदमवार, पोहवा/गोपाल वास्टर, गजानन डोंगरे, पोना/मुन्ना आडे, पंकज

पातुरकर, उल्हास कुरकुटे, पोशी/ मो. ताज, किशोर झेंडेकर, चालक पोना/दत्ता दुम्हारे, चापोशी/ नागेश वास्टर सर्व

स्थागुशा यवतमाळ तसेच सपोनि विजय चव्हाग, पौउपनि जायभाये, व पोशी/ खामकर, गिते, चव्हाण, पो.स्टे.

       इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा