भोकरची SBI मागील 4 दिवसापासून बंद; ग्राहकांची प्रचंड हेळसांड

भोकर :- रमेश गंगासागरे
भोकर तालुक्यातील सर्वात मोठी बँक म्हणून एसबीआय कडे बघितले जाते या बँकेत चालणारे सर्व कामकाज कोरोना चा पेशंट सापडल्यामुळे पूर्णतः बंद करण्यात आली असल्याने ग्राहकांची प्रचंड प्रमाणात हेळसांड होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
           भोकर शहरामधील या बँकेवर मोठ्या प्रमाणात व्यापारी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, रिटायरमेंट झालेले कर्मचारी, तसेच इतर संघटना, बचत गट यासह, अनेक प्रकारचे ग्राहक सदरील बँकेशी जोडलेले आहेत, एसबीआय बँकेचे ग्राहक अनेक लाखाच्या घरात पोहोचलेले आहेत, सदरील बँकेची उलाढाल कोट्यवधी रुपयांच्या घरात जात आहे, या बँकेचे भोकर तहसीलच्या पुढे एक एटीएम मशीन असून हे मशीन सुद्धा मागील एक आठवड्यापासून बंद असल्याने ग्राहकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे, त्यामुळे खाजगी क्षेत्रात असलेले ग्राहक सेवा केंद्र हे ग्राहकांचा कर्दनकाळ बनलेले दिसून येत आहे, एसबीआय बँकेतील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची चर्चा संबंध तालुकाभर होत आहे, त्यामुळेच ही बँक सध्या पूर्णतः बंद करण्यात आली असल्याचे अधिकृत रीत्या समजले आहे, यापुढे आणखी किती दिवस ही बँक बंद राहील हे सांगण्यास मात्र येथील बँकेच्या व्यवस्थापकांनी नकार दिला आहे.