उमरी - ( रमेश गंगासागरे ) उमरी नगरपरिषद हद्दीतील म्हाडा काँलनीत एका वृद्ध १०० वर्षांच्या मयत महिलेच्या तिरडीला खांदा देवून उमरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी माणूसकीचे दर्शन घडविले आहे.
उमरी शहरात बुधवार दि.५ आँगस्ट रोजी शहरातील म्हाडा काँलनी मध्ये एका घरातील १०० वर्षाची सुशिलाबाई बाबूलाल अग्रवाल वृध्द महिला पलंगांवर पडून शेवटची घटका मोजत असतांना तेवढ्यात तिचे निधन झाले होते सदरची घटना उमरी शहरातील म्हाडा काँलनी मध्ये घडली आहे.
उमरी नगर परिषदेत अंगणवाडी सेविका असलेल्या शोभाबाई अग्रवालची आई सुशिलाबाई अग्रवाल या वृध्द महिलेचे १०० व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले त्यांच्या घरात कोणी पूरूष नाही जवळ पास आई आणि मुलगी दोघेही वयस्कर होते.
त्या मयत वृध्द महिलेचा अंत्यविधी करण्यासाठी कोरोणाच्या भितीपोटी ना सोयरे,ना नातलग, ना शेजारी,कोणीच पूढे येत नव्हते सदरची बाब नगर परिषद प्रशासनाला कळाल्यमुळे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यानी पूढाकार घेवून स्वत: कर्मचाऱ्याच्या मदतीने अंत्यविधी ची जबाबदारी घेतली असून ते स्वत : होवून मयताच्या तिरडीला खांदा देवून दायीत्व जपले आहे, सदरील कामगिरीमूळे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांचे उमरी शहर व परिसरात कौतुक केले जात आहे.
यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी संदानंद खांडरे ,नगरसेवक बाळू शिंदे, नगरसेवक ईरबा शेळके, कर्मचारी गणेश मदणे,घणकचरा कर्मचारी कुलदिप सवई,ईश्वर रणनवरे, आदींनी अंत्यंविधी करण्यासाठी सहकार्य केले आहे.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा
0 Comments