भोकर:(रमेश गंगासागरे )


       संबंध राज्याला सळो की पळो करून सोडलेल्या या कोरोनाने आता भोकरचे तहसील कार्यालय गाठले असून यामध्ये एक कर्मचारी पॉझिटिव्ह सापडल्याने तहसिल व उपविभागीय अधिकारी कार्यालय आज सील करण्यात आले आहे त्यामुळे दिवसभर दोन्ही कार्यालयाचे कामकाज होऊ शकले नाही.
       भोकर शहरात आता बहुसंख्य कार्यालयांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने एकेक कार्यालय सील करण्यात येत आहे, यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची मुख्य शाखा सोमवारपासून बंद करण्यात आले आहे, त्यासाठी सर्व ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे, आज दिनांक 6 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयातील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यामुळे येथील तहसील कार्यालयासह उपविभागीय अधिकारी कार्यालय सुद्धा सील करण्यात आले आहे, त्यामुळे कार्यालयात कामकाजासाठी येणाऱ्या नागरीकांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड झाल्याचे दिसून येत आहे, तसेच भोकर येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील एक कर्मचारी सुद्धा पॉझिटिव आढळल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे, तर भोकर येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये सुद्धा एक महिला कर्मचारी सापडल्याचे ह्यापूर्वी प्रशासनाने जाहीर केले होते.