भोकर :(रमेश गंगासागरे ) भोकर व भोकर तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व कोविड सेंटर येथे देण्यात येणाऱ्या सोय सुविधा बद्दल जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी जिल्हया मध्ये तालुका निहाय नोडल अधिकारी समन्वयक यांची नियुक्ती केली.
     
       आज दि.४ ऑगस्ट रोजी भोकर येथील कोविड सेंटरला डॉ. एम.आर.रत्नपारखी नोडल अधिकारी व उपायुक्त जिल्हा पशुसंवर्धन यांनी भेट दिली. येथील चार रूग्ण यांना भेट दिली व येथील सोयी सुविधा बाबत विचारणा केली व देण्यात येणाऱ्या सुविधे बद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी भरत सुर्यवंशी तहसीलदार, डॉ. अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक, डॉ. राहूल वाघमारे तालूका आरोग्य अधिकारी, सत्यजीत टिप्रेसवार, पांडुरंग तम्मलवाड हे उपस्थित होते.