नांदेड :- रमेश गंगासागरे


      महाविद्यालयांमधून मास्टर ऑफ जर्नालिझम, मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम, बॅचलर ऑफ जर्नालिझम, आदी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे पदव्या देण्यात आल्या, ह्या पदव्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री, विकास कदम , यावेळी प्रोफेसर  डॉक्टर अशोक धुलधुले(नासिक रोड), प्राचार्य डॉक्टर शेखर घुंगरवार(नांदेड) व संस्थेचे सचिव श्री, आनंद भोरगे यांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या, यावेळी विपीन सर, धुळे सर, सरोदे सर, अमोल सर, नरवाडे सर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
       कोरोना काळ चालू असल्यामुळे  सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले,  यावेळी  सोशल डिस्टंसिंग, मास्क आणि सॅनेटायझरचा  वापर करण्यात आला, कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यापीठाचा ध्वज हाती घेऊन पथसंचलन करण्यात आले, त्यानंतर विद्यापीठाचे गीत गाण्यात आले, तसेच स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात येऊन पदव्या वितरित करण्यात आल्या.यावेळी डॉक्टर प्रोफेसर  डॉक्टर अशोक धुलधुले(नासिक रोड), प्राचार्य डॉक्टर शेखर घुंगरवार(नांदेड) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, अध्यक्षीय समारोप प्राचार्य विकास कदम यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सरोदे सर यांनी केले, कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. सदरील पदवी वितरण समारंभ शनिवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी पार पडला यावेळी बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
       इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा