भोकर : रमेश गंगासागरे

       येथील तहसिल व उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध असलेली तसेच जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तीसाठी वापरात येणारी लिफ्ट शासकीय ईमारत पूर्णत्वास आल्यापासून एकदाही चालू झाली नाही ती बंदच होती, यामुळे कार्यालयात कामकाजासाठी येणाऱ्या  ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत होती याबाबद  वेब न्यूज भोकर न्यूज लाईव्ह मध्ये दिनांक 14 ऑगस्ट रोजी "अन,, लिफ्टचे दार उघडलेच नाही,"  या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच खडबडून जागे झालेल्या  प्रशासनाने प्रशासकीय पातळीवरून या वृत्ताची दखल घेऊन 
        बंद पडलेल्या लिफ्टचे काम  तात्काळ पूर्ण केले तसेच भोकरला  नव्यानेच रुजू झालेले  उपविभागीय अधिकारी  श्री राजेंद्र खंदारे यांच्या कार्यालयाकडून ताबडतोब दखल घेण्यात येऊन ही बंद असलेले लिफ्ट दिनांक 25 ऑगस्ट रोजी चालू करण्यात आली. त्यामुळे सर्व  दिव्यांग  नागरिक  व  ज्येष्ठ नागरिक यांच्यात समाधान व्यक्त होत आहे आणि चालू झालेल्या प्रथम लिफ्टचा प्रवास जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अशोक चव्हाण यांनी केला. आता ही लिफ्ट कार्यालयीन वेळेत चालू राहावी अशी मागणी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिक करत आहेत.
       इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा