भोकर :- रमेश गंगासागरे 

आज दि,25 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री,अशोक चव्हाण हे दिवसभरासाठी भोकर शहरामध्ये  तळ ठोकून होते  यामध्ये त्यांनी  भोकर तालुक्याच्या विकासात्मक बाबीवर  शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सोबत सल्लामसलत केला, नारवाट येथे  बांबू प्रकल्पची निर्मिती तर  तालुक्यातील भोसे येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र  उभारणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले, 
       यांच्याहस्ते भोकर जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचची पहाणी, नगरपरिषदेच्या नव्यानेच बांधन्यात आलेल्या इमारतीची पहाणी व अर्धवट राहिलेल्या कामाबाबत वाढीव निधी त्यांनी मंजूर केला, तर दुपारी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात झालेल्या कर्मचारी वर्गाच्या बैठकीत, शेतकरी बांधवांच्या पीक कर्जावर आणि नुकसानग्रस्त  मूग पिकांचे  पाहणी करून  तात्काळ पंचनामे करण्याबाबत त्यांनी  बैठकीमध्ये  कर्मचाऱ्यांना सुचित केले, मैसा ते किनवट बायपास मार्गाचे निर्मितीही लवकरात लवकर मार्गी लावण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला तसेच भोकर ते रहाटी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात देण्याचा निर्णय त्यांनी यावेळी घेतला आहे तसेच पिंपळढव बंधारा व सुधा प्रकल्पाची उंची वाढवण्याचा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला असून वरील सर्व बाबीसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याचे त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले आहे, यासह त्यांनी विविध विकासात्मक बाबीवर चर्चा केली.