भोकर :- रमेश गंगासागरे




 भोकरचा आठवडी बाजार पुर्ववरत चालु करावा व इतर मागण्यासाठी तहसील कार्यालयासमोर उद्या वंचित बहुजन आघाडी तर्फे डफली बजाव आंदोलन असल्याचे दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.   

      

       तहसीलदार भोकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे  की, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळसाहेबआंबेडकरांनी देशातील जनतेला आपले जिवन पुर्ववत सुरू करण्याचे आव्हान केले आहे. परंतू शासनाकडून निर्बंध असल्याने त्यावर बंधने येत आहेत, त्याचाच एक भाग म्हणून १२ ऑगस्ट रोजी संपुर्ण महाराष्ट्रभर डफली बजाव आंदोलन करण्यात आले. दि १७ रोजी कंधार न.प. समोर बोम मारो आंदोलन करण्यात आले भोकरचा आठवडी बाजार पुर्ववत सुरू करावा या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आधाडीचे भोकर विधान सेभेचे जेष्ठ नेते मा.नामदेवराव आयलवाड यांच्या नेतृत्वाखाली आपल्या कार्यालया समोर दि. २०-८-२०२० रोज गुरूवारी दुपारी १ वाजता. डफली बजाव आंदोलन व भाजीपाला मार्केट भरविण्यात येणार आहे. तसेच कोरोणा कालावधीत विज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा विज देण्यात आली, कांही नागरीकांचे एक महिन्याचे उत्पन्न ही जेवढे नाही त्याच्या चार पट विज बिल देण्यात आले आहेत. ते माफ करावे, नांदेड जिल्ह्यात प्रशासनाने सोमवार ते शनिवार आठवडा केला आहे ते सोमवार ते रविवार असा करून नागरीकांना सहकार्य करावे.

इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा