भोकर :-(रमेश गंगासागरे )

भोकर तालुक्यात असलेल्या आठ स्वातंत्र्यसैनिकांचा तहशिल कार्यालयाच्या  वतीने 15 ऑगस्ट रोजी त्यांच्या राहत्या घरी जाऊन सन्मान करण्यात आला.
       संबंध राज्यामध्ये लॉकडाऊन चालू असल्याकारणाने तसेच सर्वत्र कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात असल्याने तालुक्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांना तहसील कार्यालयामध्ये ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही त्यामुळे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचा सहृदय सत्कार त्यांच्या घरी जाऊन करण्यात आला सध्या भोकर तालुक्यामध्ये स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे वारस कार्यरत आहेत यात
1. भोकर येथील- श्री. नारायण सिताराम शिंदे
2. भोकर येथील- श्रीमती मंगलाबाई बालाजी बंडावार (वारस पत्नी) 3. खरबी - श्री. गोविंदराव तुळशीराम कल्याणकर, 4. रायखोड - श्रीमती सुंदराबाई राजाराम सावंत (वारस पत्नी), 5. हाडोळी - गंगाधर गंगाराम कोलुरे, 6. कामनगाव - श्रीमती शांताबाई माणिकराव देशमुख (वारस पत्नी), 7. धारजनी - श्रीमती गंगाबाई रामजी जाधव (वारस पत्नी), 8. किनाळा - श्री. किशन सटवाजीराव पाटील,
       या सर्व स्वातंत्र्य सैनिक व स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सत्कार करण्यात आला आहे.
       इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा