भोकर :(रमेश गंगासागरे )  येथील एका शाशकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन 10 वर्षांचा कालावधी लोटला असून त्यामधील जेष्ठ नागरिक व अपंगांसाठी असलेल्या लिफ्टचा अद्याप दरवाजा उघडला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. 
        तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालय असलेल्या या भव्य इमारतीत, खाली तळमजल्यावर पार्किंग पहिल्या मजल्यावर तहसीलदार यांचे कार्यालय तर दुसऱ्या मजल्यावर उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय आणि रेकॉर्ड रूम आहे, तालुक्यातील अनेक नागरिकांना या दोन्ही कार्यालयात विविध प्रकारच्या कामासाठी इथे यावे लागत असते, तर अपंग आणि जेष्ठ नागरिकांना पायऱ्या चढण्याचा त्रास होऊ नये म्हणून शासनाने लाखो रुपये खर्च करून लिफ्टची सोय केली, पण ह्या लिफ्टचा 10 वर्षांपासून अद्याप दरवाजा न उघडल्याने या लिफ्ट पासून असंख्य लोकांना वंचती रहावे लागत आहे, आता उपविभागीय अधिकारी म्हणून दुसऱ्यानदा या ठिकाणी परवाच राजेंद्र खंदारे हे रुजू झाले असून कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे, ते तरी अपंग व जेष्ठ नागरिकांच्या होणाऱ्या या दुर्दषेकडे पाहून लिफ्ट चालू करून घेतील अशी आशा नागरिक बाळगून आहेत.
       इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेले home दाबा.