उमरी :- (रमेश गंगासागरे ) नांदेड जिल्ह्याचे नेते मा.आ.बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव येथील गोरठेकर विद्यालयात गुणवंत विद्यार्थीचा सत्कार करण्यात आला आणि उमरी येथील गोरठेकर इंग्लीश स्कुल मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा काही दिवसापूर्वीच माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्या परीक्षेत गोरठेकर विद्यालयाचा 98% निकाल लागला त्यात 3 विद्यार्थी विशेष प्रविण्यासह तर 13 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले त्या यशस्वी विद्यार्थ्यांचे मनोबल आणखी वाढवण्यासाठी व पुढील काळासाठी शुभेच्छा आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मा.आ.बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून कोरोना रोगामुळे सोशल डिस्टेनसिंग च्या आधीन राहून हा सत्कारा चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी गोदावरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विक्रम देशमुख, तळेगावचे प्रथम नागरिक शेख नवाज, मा.सरपंच गंगाधर शिगळे, रामराव कप्पावार,मोगल रमीजबेग,सतिषभाऊ देशमुख ,दशरथवाड,मारोती आरटवार,मुख्याध्यापक श्री. एस.एन. सुरकुटवार,हिवराळे, तुंबवाड, गणेश कवळे यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी डॉ.विक्रम देशमुख यांनी सध्या कोरोना रोगामुळे सर्व शाळा बंद आहेत पण ऑनलाइन वर्ग आणि क्लासेस नियमित सुरू आहेत.तरी आपण आपल्या अभ्यासात खंड न पडू देता लवकर पुढील वर्गासाठी प्रवेश घेऊन तात्काळ अभ्यासास सुरुवात करावी. आपण पुढील जीवनात असेच यशस्वी होत राहो आणि आपण आपले ,आई वडीलांचे,शाळेचे आणि गावाचे नाव झळकावे असे उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर, उमरी येथील गोरठेकर इंग्लिश स्कुल मध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वाती वचेवार आणि संस्थेचे उपाध्यक्ष विश्वजित देशमुख यांच्या शुभहस्ते शाळेच्या मैदानात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.डी. बी.कदम,गोविंद निवळे,वैजाळे यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.महेश टिप्रेसवार यांनी केले.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा

0 Comments