भोकर : (रमेश गंगासागरे ) संबंध महाराष्ट्रातील कृषी दुकानदारावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात सर्व कृषी दुकानदार 10 जुलै ते 12 जुलै पर्यंत 3 दिवस आपली दुकाने बंद ठेवणार असल्याची माहिती भोकर तालुका फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स डीलर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती सुरेश बिलेवाड यांनी कळविले आहे.
यावर्षी यावर्षी सगळीकडे सोयाबीन केलेला पेरा मनावा तसा उगवला नाही याचा फटका ठेवून अनेक जण कृषी विक्रेत्यांना कारणीभूत धरून गुन्हे दाखल करीत आहेत, याच्या निषेधार्थ संबंध महाराष्ट्रभर आम्ही कृषी दुकाने बंद ठेवत असल्याची माहिती सुरेश बिलेवाड यांनी दिली आहे. आमच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा असेही सुरेश बिल्लेवाड यांनी भोकर न्यूज लाईव्हशी बोलताना म्हटले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की आमची संघटना ही आमच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढत आहे, 3 दिवस शेतकऱ्यांना त्रास देण्याचा आमचा काही मनोदय नाही, तरी शेतकरी बांधवांनी आम्हाला सहकार्य करावे असेही त्यांनी म्हटले आहे.
आम्ही खालील मागण्या मान्य करण्यासंदर्भात लढा देत आहोत.
१) विक्रेत्यास कृषि विभागाने मान्यता दिलेल्या कंपन्याकडून कृषि विभागाकडील अधिका-यांनी गुणवत्तेबाबत प्रमाणिकरण
केलेले बियाण्याचा पुरवठा सीलबंद पॅकींगमध्ये केला जात असून,सदर बियाणे उत्पादक कपन्याकडून सीलबंद पॅकींगमध्येच विक्रेता शेतक-यास विक्री करीत आहे. बियाणे उत्पादन करणे किंवा गुणवत्ता प्रमाणीकरण करण्याचे काम विक्रेता करीत
नसल्याने, सोयाबीन किंवा इतर कोणतेहि बियाणे उगवले नसल्यासंबंधीचे शेतक-यांनाचे तक्रारीस अनुसरुन, सीलबंद बियाणे
विक्रीचे काम करुनहि,विक्रेत्यास जबाबदार धरुन विक्रेत्यावर गुन्हे (FIR)नोंदविण्यात येऊ नये.तसेच गुन्हे नोंदविण्याबाबतचा
विक्रेत्यावरील अन्यायकारी निर्णय तातडीने रद करण्यात यावा.
२) राज्यातील सर्व विक्रेते कृषि खात्याने मान्यता दिलेल्या उत्पादक कंपन्यांचे बियाणे,रासा.खते,किटकनाशक औषधे व
मायक्रोन्युट्रन इत्यादि सर्व माल शेतक-यास विक्री करीत आहे.दुकानातील मालाची व विक्री संबंधी कृषि विभागाचे तालुका
स्तरापासून आयुक्तालय स्तरापर्यंतचे सर्व अधिकारी विक्रेत्याचे दुकानामध्ये जाऊन तपासणी करीत असतात.विक्रेता कोणत्याहि
प्रकारच्या निविष्ठांचे उत्पादन करीत नसल्याने,योगस बियाणे रासा.खते व अन्य निविष्ठामुळे निर्माण होत असलेल्या
तक्रारीसाठी, विक्रेत्यास विनाकारण जबाबदार धरुन त्याचेवर अन्यायकारक कारवाई करण्यांत येऊ नये,
३)विक्रेत्याकडून तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांची रक्कम,गेली अनेक वर्षे कृषि विभागाकडून विक्रेत्यांना गेली १५ वर्ष
कालावधीत अदा केलेली नाही.तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्याची रक्कम अदा करणेबाबत गेली १५ वर्षे संघटनेकडून समक्ष
भेट घेऊन तसेच लेखी विनंती पत्राव्दारे मागणी करूनही विक्रेत्यांना येणे असलेली सुमारे १५ कोटी रक्कम अदा करण्याचे
मागणीबाबत कोणतीहि कार्यवाही झालेली नाही.किंवा या मागणीसंबंधी कृषि विभागाकडून होत असलेली कार्यवाही संघटनेस
एका पत्राने कळविलेही जात नाही.यासंबंधी तातडीने कार्यवाही होऊन देय रकमा अदा व्हाव्यांत.

0 Comments