भोकर :(रमेश गंगासागरे ) आज दिनांक 15 जुलै रोजी मा.श्री.खुशालसिंह परदेशी (अपर जिल्हाधिकारी नांदेड) यांनी भोकर तालुक्यातील कोव्हीड सेंटर इथे भेट देऊन पाहणी केली.
![]() |
| भोकर येथील कोविड सेंटरची पाहणी करताना परदेशी दिसत आहेत |
तसेच तालुका कृषी कार्यालय भोकर येथील
मियावाकी पध्द्तीने झाडं लावण्याच्या ठिकाणी तसेच मा. उपविभागीय अधिकारी भोकर व मा. तहसीलदार भोकर यांचे प्रशासकीय निवासस्थानी मियावाकी पद्धतीनेलावण्यात आलेल्या झाडांची पाहणी करुन दोन्ही ठिकाणी त्यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच उपविभागीय
अधिकारी कार्यालय इथे प्रमुख अधिकारी यांची बैठक घेऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता आवश्यक
यादौरा दरम्यान मा. पवन चांडक (उपविभागीय अधिकारी भोकर), मा.भरत सुर्यवंशी (तहसीलदार भोकर),
मा.अशोक मुंडे (अधिकारी, शासकीय रुग्णालय भोकर), मा. राहुल वाघमारे (तालुका आरोग्य अधिकारी भोकर), मा.
विठ्ठल गीते (तालुका कृषी अधिकारी भोकर), मा.आशिष हिवरे (वनपरिक्षेत्र अधिकारी भोकर) हे उपस्थित होते.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा


0 Comments