भोकर : (रमेश गंगासागरे ) भोसी तालुका भोकर येथील एका बेपत्ता झालेल्या तरुणाचा 4 दिवसानंतर आज सकाळी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे
घटनेबाबत समजलेली थोडक्यात माहिती अशी की, भोसी तालुका भोकर या गावातील विनायक प्रभाकर देशमुख कल्याणकर वय 29 वर्ष हा तरुण दिनांक 3 जुलै रोजी सकाळी दूध आणण्यासाठी आपल्या शेताकडे गेला होता तेव्हापासून तो घरी परतला नसल्याने चिंतेचे वातावरण होते, भोकर पोलीस स्टेशन मध्ये सदरील तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती, तरुण बेपत्ता झाल्याचे कळताच गावातील नागरिकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला असता दिनांक चार जुलै रोजी त्याच्या शेताच्या दोन किलोमीटर दूरवर स्वतःची मोटरसायकल आढळून आली, त्यामुळे सदरील बेपत्ता तरुणाला शोधण्यासाठी युद्धपातळीवर मोठे प्रयत्न करण्यात आले,
नांदेड वरून श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते, तेव्हा सुद्धा तरुणाचा कुठेच ठावठिकाणा आढळून आला नाही, आज दिनांक 7 जुलै रोजी भोशी शिवारात सकाळी उसाच्या फडात मोठ्या कॅनॉलच्या बाजूस सदरील बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली होती, तरूणाचा मृतदेह पाहण्यासाठी भोसी च्या नागरिकांनी एकच गर्दी केली होती, सदरील तरुणाच्या मृत्यू विषयी शंका कुशंकेस तालुक्यात उधान आले असुन, सदरील तरुणाच्या उत्तरीय तपासणीनंतर खरा प्रकार उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, मयत तरुणाची उत्तरीय तपासणी नांदेड येथील सरकारी दवाखान्यात करण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे, सदरील तरुण घरातील कमावता व्यक्ती असल्याने सर्वत्र त्याच्या मृत्युने हळहळ व्यक्त केल्या जात आहे, विनायक प्रभाकर देशमुख यांच्या पश्चात आई-वडील, एक छोटा भाऊ 2 बहिणीअसा परिवार आहे.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा


0 Comments