भोकर :( रमेश गंगासागरे ) लॉकडाऊन कार्यकाळात सुद्धा केंद्र शासनाने पेट्रोल व डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ केल्यामुळे भोकर काँग्रेसच्यावतीने आज तहसील कार्यालयाच्या पुढे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
मागील तीन महिन्यापासून नागरिक लोक डाऊन असल्यामुळे आपल्या घरात बंदिस्त आहेत दुकाने बंद आहेत सर्व व्यवहार ठप्प आहेत असे असतानाही केंद्र शासनाने पेट्रोल व डिझेलच्या दरात दररोज भरमसाठ वाढ करत असल्यामुळे शेतकरी सामान्य नागरिक यात भरडल्या जात आहे त्यामुळे ही दरवाढ तात्काळ मागे घेण्यात येऊन सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे भोकर काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
सदरील धरणे आंदोलनात जिल्हा परिषदेचे सदस्य रावणगावकर, जगदीश पाटील, गोविंदबाबा गौड पाटील, सुभाष पाटील किन्हाळकर, रामचंद्र मुसळे, खाजू इनामदार, मिर्झा ताहेर बेग, हमीदखान पठाण, धोंडगे, गोवंदे, यांच्यासह असंख्य काँग्रेस प्रेमी नागरिकांची उपस्थिती होती आंदोलनानंतर तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या homr वर क्लिक करा


0 Comments