भोकर :(रमेश गंगासागरे ) मागील 5 वर्षांपासून संथ गतीने चालणाऱ्या कामामुळे आतापर्यंत अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तरीपण प्रशाषणाला जाग आली नाही, आता काल दि, 4 जुलै रोजी आणखीन एका तरुणाला याच रोडवर अपघातात आपला प्राण गमवावा लागल्याची दुःखद घटना घडली आहे.
घटणे संबंधी थोडक्यात माहिती अशी की, राप्ष्ट्रीय महामार्ग रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला असून भोकर पासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर मौजे वाकद शिवारात नांदेड कडून भरधाव वेगाने येणाऱ्या ओमिनी जीपने एका मोटार सायकलस्वारास उडवल्याची दुर्दैवी घटना दि.४ जुलै रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. भोकर मार्गे रहाटी बॉर्डर तेलंगाना कडे जाणारा २२२ राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम गेल्या चार ते पाच वर्षांपासून मंदगतीने चालू आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी दयनीय अवस्था या रस्त्याची झाली असून दोन तीन दिवसा आड एकतरी अपघात होत असतो. शनिवार दि.४ जुलै रोजी भोकर तालुक्यातील भुरभूशी गावचा तरुण आनंद बाबुराव गाडेकर वय ३३ हा आपल्या गावाकडे येऊन परत ड्युटीवर परतूरला आपली मोटारसायकल क्रमांक एम.एच २४ सीएस ८७८३ ने जात असताना वाकद शिवारात नांदेड कडून भरधाव येणारी ओमिनी जीप क्रमांक २६ बीसी २८९८ च्या चालकाने समोरून जोराची धडक दिल्याने मोटार सायकलचा चेंदामेंदा झाला असून भीषण अपघातात आनंदा गाडेकर याचे पाय मोडून डोक्याला गंभीर मार लागून जखमी झाला होता. अपघात एवढा भयंकर होता की ओमिनीचा समोरचा भागही तुटून चूराडा झाला आहे.
आनंदा गाडेकर यास तात्काळ दुसऱ्या एका कारने नांदेडच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तिथे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. गाडेकर यांचे लग्न २० जुलैला होणार होते परवाच दोन दिवसांपूर्वी त्यांची सोयरिक झाली होती.
इतर बातम्या वाचण्यासाठी खालील home दाबा

0 Comments