भोकर : (रमेश गंगासागरे ) उपविभागीय कार्यालयातील कोविड प्रतिबंधात्मक भरारी पथकाचे प्रमुख नायब तहसीलदार यांच्या कक्षात जाऊन अरेरावीची भाषा वापरून धमकी दिल्याप्रकरणी पिता, पुत्रावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पिता, पुत्राला अटक करून गजाआड करण्यात आले आहे .
      सविस्तर वृतअसे दि. ७ जुलै रोजी संध्याकाळी कोविड२०१९ प्रतिबंधात्मक भरारी पथकाचे प्रमुख नायब तहसीलदार सतिश माणिकराव जोहरे शहरातील दुकाने नियमाप्रमाने वेळेत दुकाने बंद झाले किंवा नाही याची पहाणी करीत असता अवधुत किशनराव हुलगुंडे यांनी आपले किराणा दुकान बंद केले नसल्याने पथक प्रमुख यांनी त्यांचे दुकान सिलकेले. आणि दि. ८ जुलै रोजी कार्यालयात येऊन नियमाप्रमाने दंड भरल्यानंतर सिल काढण्यात येईल असे सांगितले पण आरोपीने नियमाची पुर्तता न करताच लावलेले सिल तोडून दुकान सुरू केला हे भरारी पथकास पुन्हा निदर्शनास आल्याने पुन्हा दि. ८ जुलै रोजी संध्याकाळी आरोपीचे दुकान सिल केले असता दि. ९ जुलै रोजी आरोपी अवधुत हुलगुंडे व त्यांचे पिता किशनराव विठोबा हुलगुंडे दोघे दुपारी एक ते दिडच्या सुमारास नायब तहसीलदार यांच्या कक्षात जाऊन आमच्याच दुकानास पुन्हा, पुन्हा सिल का लावता, असे म्हणून आरेराविची भाषा वापरून धमकी देउन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची फिर्याद दाखल केल्याने भादवी ३५३, १८६, १८८, २६९, २७०, ५०४ कलमान्वये भोकर पोलीसात गुन्हा दाखल करून आरोपीनां तात्काळ अटक करून गजाआड केले .पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार पठाण करत आहेत .
      इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा