भोकर :(रमेश गंगासागरे )
कोरोनाच्या कार्यकाळात भोकर शहरात धाडसी चोरी झाली असून ह्या चोरीचा भोकर पोलिसांनी अवघ्या काही तासातच छडा लावून चोरट्यास बेड्या ठोकल्या आहेत, त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घटनेबाबत प्राप्त झालेली माहिती अशी की भोकर शहरातील जेटीबा वर्षेवार नगर येथील रहिवाशी नामे अवधुत गंगाधर रावलोड व्यवसाय नोकरी यांच्या घरी दिनांक 25 जून रोजी मध्यरात्री धाडसी चोरी झाली या चोरीमध्ये जवळपास सोने-चांदी यासह अडीच लाखाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला होता, याबाबत त्यांनी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केल्यावरून भोकर पोलिसांनी आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन भोकर ग.र.न. 279/2020 कलम 487,454,380 भा.द.वि.
प्रमाणे दाखल झाला केला होता. त्यावरून भोकर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून अवघ्या काही तासातच शहरातील नंदी वाले गल्लीत राहणाऱ्या एका चोरट्यास पकडून त्याच्याकडून सोने 47.300 ग्रॅम वजनाचे किमंती 2.,35,000/- रुपयाचा व चांदी 178.650 ग्रॅम वजनाची किमंती अंदाजे 10,332/-रुपयाचा असा एकुण 2,45,332 रुपयाचा मुद्देमाल आरोपी अशोक खंडु नकलवाड याच्या घरून जप्त करण्यात आला आहे.

या कामी पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या
मार्गदर्शनाखाली स.पो.नि.एस.बी.डेडवाल, पोकॉ/2650 प्रकाश श्रीरामे, पोकॉ 580 कृष्णा तलवारे, पोकॉ/2769 ज्ञानेश्वर सरोदे, चापोना/ 1173 सोनाजी कानगुले यांनी यशस्वी कामगिरी बजावली.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा

0 Comments