भोकर :(रमेश गंगासागरे ) लॉक डाऊनच्या कार्यकाळात सुद्धा भोकर मध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत होता गुटखा विक्रेते पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करून दिवसाढवळ्या राजरोसपणे शासनाने बंदी असलेला गुटखा विक्री करत होते याप्रकरणाची कुणकुण अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांना मिळाल्यावरून त्यांनी धाड टाकून पंधरा हजार रुपयाचा गुटका व गुटख्याचा होलसेल व्यापारी रज्जाक शेख हबीब राहणार समता नगर भोकर यास अटक केली आहे.
संग्रहित छायाचित्र
       मागील अनेक महिन्यापासून महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटका भोकर शहरामध्ये राजरोसपणे विक्री होत आहे, हा गुटखा शहरातील विविध भागात चढ्या दराने विक्री केला जात होता, रसायनमिश्रीत गुटखा विक्री होत असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांना मिळाल्यावरून त्यांनी दिनांक 3 जुलै च्या रोजी काही निवडक पोलीस घेऊन धाडसत्र चालवले यात रुपये पंधरा हजाराचा आणि गुटका विक्रीचा शिलेदार रज्जाक शेख हबीब हा हाती लागला  यास पकडून अन्न व औषधी प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक महेश गूळगुट्टे, पुंडलिक दांडगे, दिगंबर मैदमवाड हे सामील होते.
       यासह शहरात मटका ही चालू असल्याची चर्चा जोर धरू लागली असून मटका चालकास पकडून कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
       इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा