नायगांव ता.प्र./ गंगाधर गंगासागरे 

     रेती वाहतुकीमुळे सांगवी - मेळगाव धनंज रस्त्याची दुरवस्था झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रात प्रकाशित होताच स्थानिक आ. राजेश  पवार यांना जाग आली . दरम्यान मेळगाव येथील उपसरपंच प्रतिनिधी प्रकाश महिपाळे यांनी रस्त्याची दुरवस्था झालयाची तक्रार तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना दिली याची दख्खल घेत खुद्द जिल्हाधिकारी यांनी दिनांक २ जुलै रोजी मेळगाव रस्त्याची पहानी करुन रस्ता दुरुस्ती होईपर्यंत रेतीचे हायवा टिप्पर वाहतुकीवर बंदी घातली आहे.
    सदर रस्त्याची दुरावस्था झालेली पाहून आ. राजेश  पवार यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून सदर रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्यामुळे गुडघाभर चिखल झाला आहे.त्यामुळे रस्त्यावरून चालणे सुधा कढीण झाले आहे.सदर रस्तात्यावर रेती साठ्याची उपसा केला जातआहे त्यामुळे हायवा टिपर क्षमते पेक्षाही जास्त प्रमाणात रेती भरुन नेत असताना रस्त्यांवर गुडघ्याभर मोठ मोठे संख्येने खड्डे, चिखलातून प्रवास करत असतात रेती वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी चे निवेदण दिले होते.
   यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विपीन वीटणकर सदर सांगवी - मेळगाव रस्त्याची पहाणी साठी आले आसता
     रस्त्यातच मोठा चीखलाचा कहर पाहून  आपले वाहन सोडले व  मोटरसायकल वरुन पाच किलो मीटर अंतर पार करत मेळगाव, धनंज रस्ता पहाणी केली. गावातुन रेती वाहतूकीला गावकऱ्यांनी विरोध केला पाहिजे तरच रस्ता चांगला राहील . रेती वाहतूक टिपर ने केली जाणार नाही फक्त ट्रॅक्टरने करा  , रेती साठ्या चोरी करत असताना तहसीलदार  तुम्ही काय करता.दोषी टीपर वर व दोषी अधिकारी यांच्या वरही कारवाई झाली पाहिजे तरच रेती अवैध वाहतूक बंद होईल .असी सुचना जिल्हाअधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नायगाव तहसीलदार सुरेखा नांदे यांना दिल्या.
   शेतकऱ्यांनी शेतात ठेकेदारांना वाळू टाकून देऊ नये आसे सरपंच आनंदराव पाटील शिंदे यांना ठणकावून सांगितले  , शेतकरी शेतात पीके घ्यावी रेती साठ्या करु देवु नये , शेतकरी यांच्या वरही कारवाई केली जाईल. असे शेतकऱ्यांना  सांगितले. रेती वाहतुकी मुळे रस्ता खराब होत आहे त्यामुळे शेतकरी यांनी रेती चोराला पकडून द्या असे आवाहन नागरिकांना केले.
    सदर रस्त्या लवकरात लवकर दुरुस्त केला जाईल  अशी माहिती आ. राजेश पवार यांनी गावातील नागरिक यांना दिली.
   यावेळी आ. राजेश पवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन वीटणकर, उपविभागीय अधिकारी एस.ए.झाडके , तहसीलदार  सुरेखा नांदे, उपविभागीय अधिकारी कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रांजल पाटील,मंडळ अधिकारी नवाज शेख, ईकळीमाळ सजाचे तलाठी श्री.सोनवणे, कुंटुर ठाण्याचे सपोनि के. एच. पठाण,मेळावचे सरपंच प्रतिनिधी आनंदराव पाटील शिंदे, धंनज चे सरपंच श्री सुर्यवंशी ,पोलीस पाटील गावातील नागरिक शेतकरी उपस्थित होते.