भोकर :(रमेश गंगासागरे ) तालुक्यातील रिठा येथील एक नागरिक कोरोना पॉझिटीव्ह आढळला असून दुसरी एक महिला पॉझिटिव्ह असल्याचे आज स्पष्ट झाले आहे भोकर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आव्हान करण्यात आले आहे.

       मंजुळा नगर येथील रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे घेण्यात आलेले  स्व्याब  निगेटिव्ह आले तर इतर तिघांचे घेण्यात आलेल्या स्व्याब पैकी ग्रामीण रुग्णालय भोकर येथील एक 36 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले आहे. मंजुळा नगर येथील  रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे  डॉक्टरांनी सांगितले आहे.
       नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शासकीय नियमांचे पालन करावे, स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाचे रक्षण करावे असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या रिठा येथील रुग्ण नांदेड येथील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेत असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
        इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा