भोकर :(रमेश गंगासागरे ) दिनांक 21 जुलै रोजी घेण्यात आलेल्या आठ जणांच्या स्वॅब पैकी एका 50 वर्षीय नागरिकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आल्याने त्यास भोकर येथील कोविड सेंटर मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
       
ह्या पूर्वी शहरातील पवार कॉलनी भागातील एक तरुण पॉझिटिव्ह सापडला होता, त्यानंतर हा संपूर्ण परिसर प्रशासनाने सील केला होता, आता बऱ्याच कालावधीनंतर शहरातील मंजुळा नगर भागातील एक 50 वर्षीय नागरिक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे शहरात व तालुक्यात खळबळ उडाली आहे, सदरील नागरिकाच्या संपर्कातील पाच जणांना त्यांच्या राहत्या घरीच होम कोरणटाईन करण्यात आले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
       नागरिकांनी घाबरून न जाता फक्त अत्यावश्यक कामासाठीच घराच्या बाहेर पडावे, शासनाच्या नियमाचा कोणीही भंग करू नये, स्वतःची व स्वतःच्या परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
       इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा