नांदेड :(संदिप गंगासागरे ) नायगांव तालुक्‍यातील कुंटूर पोलीस ठाण्‍याचे  कर्तव्‍यदक्ष स.पो.नि. करीम पठाण व मागील दोन दशकापासून पत्रकारीता क्षेत्रात उल्‍लेखनिय भुमिका साकारनारे नरसी येथील जेष्‍ठ पत्रकार गंगाधरराव गंगासागरे या कोरोना योध्‍यांचा सन्‍मान दिव्‍यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या संस्‍थेच्‍या वतीने सन्‍मानपत्र देवून गौरव करण्‍यात आला आहे .
       दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र ही संस्‍था एक अराजकीय संघटना असून या संस्‍थेचे संस्‍थापक सी.व्‍ही. डाकोरे यांनी या कोरोना महामारीच्‍या काळात आरोग्‍य कर्मचारी , पोलीस कर्मचारी व पत्रकारीता क्षेत्रात उल्‍लेखनिय कार्य करण्‍या-या व्‍यक्‍तींचा सन्‍मान करुन त्‍यांच्‍या कार्याला उभारी देण्‍याचे कार्य अवलंबीले असून त्‍यानुसार सपोनि करीम पठाव व जेष्‍ठ पत्रकार गंगाधरराव गंगासागरे यांचा सन्‍मान पत्र देवून गौरव केला आहे . तसेच नरसी येथील नवोदीत पत्रकार सयद अजिमभाई यांचा देखील सन्‍मानपत्र देवून गौर केला आहे .
     या सन्‍माना बदल सर्व स्‍थरातून स्‍वागत करण्‍यात येत आहे
       इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा