भोकर :(रमेश गंगासागरे ) मागील चार ते पाच दिवसापासून भोकर शहरातील विविध भागात अंगणवाडी कर्मचारी व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
हे कर्मचारी शहरातील वार्डा वार्डात फिरून प्रत्येक घरातील वय वर्ष 50 वरील ज्येष्ठ नागरिकांच्या शरीराचे तापमानसह विविध चाचण्या करताना दिसून येत आहेत, विशेष करून सर्दी, ताप, खोकला याविषयी सुद्धा माहिती गोळा करण्यात येत आहेत, जेणेकरून कोरोना सारखा महाभयंकर रोग इतरस्त्र पसरू नये, याची काळजी घेताना प्रशासन सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे, पण सदरील तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे अपुऱ्या सुरक्षा सुविधा असूनही हे कर्मचारी जीवाची परवा न करता ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करताना दिसून येत आहेत, ह्या कर्मचाऱ्यांकडे मास्क आणि हॅन्ड ग्लोज शिवाय दुसरे कोणते साहित्य दिसून येत नसल्याने, त्यांना फेस शील्ड हँडवॉश, विमासह जास्तीचे सुरक्षा साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
![]() |
| ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करताना अंगणवाडी कर्मचारी दिसत आहेत |
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा.

0 Comments