नायगांव (ता.प्र) गंगाधर गंगासागरे 
       जागतिक स्‍तरावर ओढावलेल्‍या कोरोना महामारीच्‍या संकटाचा मुकाबला करण्‍याकरीता सर्व शासकीय यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे सोबतच गाव पातळीवर आपले सरकार सेवा केंद्राचे केंद्र चालक हे देखील मोठया जीकीरीने काम करीत आहेत . मात्र मानधन मिळत नसलयामुळे व्‍यवस्‍थापनाच्‍या विरोधात तीव्र नाराजी व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे .
      मागील दहा वर्षापासून गावपातळीवर ग्रामपंचायत कार्यालयात संगणक परीचालक ( आपले सरकार सेवा केंद्र चालक ) म्‍हणून महत्‍वाची भुमिका साकारणारे केंद्र चालक हे शासनाने आदेशीत केलेली सर्व कामे विनाविलंब करीत आहेत . मात्र मिळणारे तुटपूंजे मानधन वेळेवर मिळत नसल्‍यामुळे केंद्र चालकावर उपासमारीची वेळ आली आहे .  शासनाच्‍या सी.एस.सी. एस.पी. व्‍ही. कंपनी मार्फत मानधन देण्‍याची प्रक्रीया होती मात्र सदरील कंपनीची मुदत दिनांक 31 मार्च 2020 रोजी संपली आहे. आणि मानधनही थकीत आहे . त्‍यामुळे केंद्र चालक हा मानधनापासून वंचित आहे .
  सध्‍या कोरोना महामारीचे संकट जागतिक स्‍तरावर सुरु आहे, या संकटाचा मुकाबला सर्व यंत्रणा करीत आहेत . अशा परिस्थितीत केंद्र चालकांना कामाच्‍या मोबदल्‍यापासून वंचित ठेवणे योग्‍य नाही असे असे ग्रामविकास विभागाचे अतिरीक्‍त मुख्‍य सचिव अरविंद कुमार यांनी म्‍हटले असून, त्‍यांनी सर्व जिल्‍हयातील जि.प. च्‍या मुख्‍यकार्यकारी अधिकारी यांना शासन निर्णयादवारे कळविले आहे की, माहे एप्रील ते जुन 2020 या तिन महीण्‍याची रक्‍क्‍म हे 14 च्‍या वित्‍त आयोगाच्‍या  अखर्चित निधीमधून ग्रामपंचायतीकडून घेवून आर जी एस ए च्‍या खात्‍यात तात्‍काळ जमा करण्‍यात यावी .तसेच 15 व्‍या वित्‍त आयोगाचा निधी ग्रामपंचायतीच्‍या खात्‍यात जमा झाल्‍यानंतर या रकमेचे समायोजन करुन घ्‍यावे आणि उर्वरीत जुलै 2020 ते मार्च 2021 या कालावधीची रक्‍कम ग्रामपंचायतीकडून विनाविलंब प्राप्‍त करुन घेवून आर जी एस ए च्‍या खात्‍यात जमा करावी . असे आदेशीत केले आहे .
     तरी जि . प . विभागाने सदरील कार्यवाही तात्‍काळ पुर्ण करुन केंद्र चालकांना तात्‍काळ मानधन दयावे अशी मागणी केंद्र चालकांतून करण्‍यात येत आहे .
   
संबंधीत ग्रा.पं. कडून निधी मिळताच मानधन देण्‍यात येईल -
                         सिध्‍दोधन लोने 
       दरम्‍यान काळात केंद्र चालकांचे मानधन थकीत आहे हे जरी खरे आसले तरी संबंधीत ग्राम पंचायतीकडून आपले सरकारच्‍या खातयामधे आर. टी. जी. एस. च्‍या माध्‍यमातून निधी जमा केल्‍यास लवकरच मानधन अदा करण्‍यात येईल अशी प्रतिक्रीया सी एस सी एस पी व्‍ही चे नांदेड जिल्‍हा व्‍यवस्‍थापक सिध्‍दोधन लोने यांनी दिली .
       इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा