नायगांव :(ता.प्र.) गंगाधर गंगासागरे
     संपुर्ण देशात थैमान घातलेल्या कोरोना महामारी या विशाणूजन्य आजाराने ग्रामिण भागात शिरकाव केला असून नरसी (ता.नायगांव खै.) येथील दोन पुरुष दिनांक १२ रोजी पॉजीटिव्ह आले येथील बालाजी नगर मधील ४८ वर्षीय पुरुष, शामनगर मधील ४३ वर्षीय पुरुष यांच्या  कुटूंबियातील  नागरिकांना होम कोरंटाईन केले होते .
        त्यांचे स्वॕब तपासणीसाठी पाठवले होते, त्यात शामनगर येथील रुग्णाच्या सहवासातील चार व बालाजीनगर येथील रुग्णाच्या सहवासातील दोन यांचे रीपोर्ट पॉजीटिव्ह आल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शेख बालन यांनी दिली आहे.
 नरसीतील कोरोना बाधीतांची संख्या आता ९ झाल्यामुळे नागरीकांत भितीचे वातावरण पसरले आहे.
 
       नरसी येथील खाजगी डॉक्टरही कोरीना बाधीत ! 
   
        येथे रुग्ण सेवा बजावणारे एक नामवंत डॉक्टर देखील पॉजीटिव्ह निघाल्याचे सांगण्यात आले आहे. सदरील डॉक्टरकडे बालाजी नगरचा रुग्ण काही दिवसांपुर्वी उपचारासाठी आला होता, त्यामुळे ते कोरोना बाधीत झाले आसल्याचे बोलल्या जात आहे .
    याबाबत सदरील डॉक्टरांसी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला आसता ते म्हणाले की, मला कोरोनाची कोणतीही लक्षणे जानवत नाहीत, पण रीपोर्ट पॉजीटिव्ह आला आहे, त्यामुळे मी पुढील अधिकच्या तपासण्या करण्यासाठी नांदेड येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल झालो असे सांगीतले आहे .
       इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर् क्लिक करा