भोकर :(रमेश गंगासागरे ) 
       पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्री मार्कंडेय ऋषी मंदिराच्या मुख्य प्रवेश द्वाराची चौकट बसवण्याचे काम आज शास्त्रीनगर येथे शहरातील समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडले.
     
श्री मार्कंडेय ऋषी मंदिराची हीच ती भव्य चौकट
अनेक दिवसांपासून मार्कंडेय ऋषी मंदिराचे काम पूर्ण व्हावे असे शहरात राहणाऱ्या पदमशाली समाज बांधवांची इच्छा होती, त्या कामाला २०१९ मध्ये सर्व समाज बांधवांनी पुढाकार घेऊन सुरवात केली व देणगी स्वरूपात मिळालेल्या रक्कमेतून भव्य मंदिर निर्माण करण्याचे काम चालूू झाले आहे.
हेच ते भोकर शहरात आकार घेत असलेले मार्कंडे ऋषी यांचे भव्य मंदिर
        मंदिराचे काम आता चौकट बसवण्या पर्यंत झाले म्हणून दि.१० जुलै २०२० रोजी चौकट  बसवण्याचा सोहळा पार पडला आहे, सदरील मंदिरास कै.साईनाथ नारायणराव चाटलवार यांच्या स्मरनार्थ धाकटा मुलगा संदीप चाटलवार यांनी भव्य अशी चौकट दान दिली आहे, ती चौकट आज रोजी समाज बांधवांच्या उपस्थिती मध्ये बसवण्यात आली, आहे. शास्त्री नगर भोकर येथे यावेळी डॉ. सदाशिव मारावार, भुजंग मामीडवार, व्यंकटराव चाटलवार, आडेलू ताटीकोंडलवार, दिगंबर नारायण गुंडेवार ,साईप्रसाद चाटलवार, रामराव पुलकंठवार, माधव मामीडवार, श्रीराम मेकेवाड, माधव मेकेवाड, सत्यवान लाटकर, परमेश्वर कैरमकोंडा, संदीप चाटलवार, नरसिमल्लु पचनुरे, राजेंद्र अनमोलवार, शंकर सबनवार ,बाळू कोकुलवार, शिवकैलास सुंकेवारसह असंख्य समाज बांधवांची उपस्थिती होती.
       इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा