भोकर :(रमेश गंगासागरे )  पंचायत समितीच्या समोर व नूतन शाळे समोर मागील अनेक वर्षापासून छोटे-मोठे व्यवसायिक व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहेत आता प्रशासनाने वॉल कंपाऊंड करावयाच्या नावाखाली सदरील दुकाने काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, अशाने कोरोना काळात पुन्हा बेरोजगारी वाढेल म्हणून सदरील दुकाने काढण्यात येऊ नये अशी मागणी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष हमीदखान पठाण, बाबाखान पठाण आणि इतर नागरिकांनी केली आहे.
     
      देशात कोरोना महामारीने हाहाकार माजवला असून देशभरात लॉक डाउन चालू आहे, अशातच अनेक नागरिक, व्यापारी व दुकानदार मागील तीन महिन्यापासून आपल्या घरात बंदिस्त होते व आहेत, त्यामुळे उद्योगधंदे बंद असल्याने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशातच भोकर मध्ये उपासमारीने पछाडलेल्या नागरिकांची दुकाने काढण्याचा निर्णय उपविभागीय अधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी घेतला असल्याने सर्व नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे, पंचायत समिती भोकरला  1 कोटी 40 लक्ष रुपयाचा  निधी  प्राप्त झाला असल्याचे  गटविकास अधिकारी यांनी सांगितले आहे, आताचा काळ हा आजपर्यंतच्या कार्यकाळातील अत्यंत अवघड काळ आहे, एकीकडे कोरोना तर दुसरीकडे पावसाळा, दुकानदार लोकांनी जावे तर कुठे जावे, आता कुठे 4 दिवसात व्यवसायाची घडी बसत असताना प्रशाशनाने हेतुपुरस्सपर दुकाने उठविण्याचा चँग बांधला असल्याच्या प्रतिक्रिया भोकर शहरात उमटत आहेत, आता मोठा प्रश्न उभा आहे, तो हातावर पोट असलेल्या नागरिकांनी व दुकानदारांनी जगावे कसे, एकीकडे सामाजिक कार्यकर्ते गरीब नागरिकांना जगण्यासाठी राशनची किट वाटप करतांना गलोगलीत आपण पहात आहोत, तर दुसरीकडे हेच शासन आज कोरोना काळात दरमहा गरिबांना मोफत दाळ आणि तांदूळ वाटप करून मानवतेचा संदेश देत आहे. पण भोकर मध्ये वेगळेच चित्र पहावयास मिळते आहे, मागील महिन्यात भाजीपाला विक्रेत्या गरीब नागरीकांना त्यांच्या पारंपारीक मूळ जागेवरून बेदखल करण्यात आले आहे, त्याबद्दल शोषल मिडियामधून तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत, असे असतांनाच आता शाशन  गरीब नागरिकांना सहकार्य करायचे सोडून त्यांना बेदखल करत असल्याने काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष हमीदखा पठाण, बाबाखान पठाण यांच्यासह अनेक नागरिकांनी जिल्हा प्रशाषणाला विनंती करून दुकानदार नागरिकांना कोरोना कार्यकाळ व पावसाळा असल्याने सहकार्य करण्याची विनंती केली आहे. यावर आता प्रशाशन दुकानदारांना सहकार्य करेल का बेदखल करेल हे पहाणेच योग्य ठरेल.
       इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा