भोकर :-रमेश गंगासागरे 
       येथील बाजार समिती यार्ड मध्ये होत असलेली भाजीपाला विक्रीची बीट बंद करावी अशी मागणी व्यापारी असोसिएशनने करून भाजीपाला बी टबंद न केल्यास अडत व्यापार बंद ठेवण्याचा इशारा दिला होता त्यानुसार कुठलीही मागणी मान्य न झाल्याने भोकर येथील आडतव्यापार आज बंद असल्यामुळे शेतकरी वर्गांचे नुकसान झाले.
 कोरोणा संकटाच्या काळात भोकर बाजार समिती यार्डात होत असलेली गर्दी लक्षात घेता आठवडी बाजार दैनंदिन बाजार व भाजीपाला विक्रीची बीटबंद करण्यात आली होती मात्र काही दिवसानंतर त्याच ठिकाणी भाजीपाला विक्रीची बी ट सुरू झाली प्रचंड प्रमाणात होणारी गर्दी ही कोरोना संकटाची भीती निर्माण करणारे होती दररोज त्या ठिकाणी गर्दी करणे आणि भाजीपाल्याची घाण दुर्गंधी येत होती त्यामुळे व्यापाऱ्यांनी बाजार समिती ,सहाय्यक निबंधक,
     
       नगरपरिषद कार्यालय यांना निवेदन देऊन भाजीपाला मार्केट ची बीट बंद करण्यात यावी अशी मागणी केली होती बीट बंद न झाल्यास आम्ही आडत व्यापार बंद ठेवू असा इशारा देखील व्यापारी असोसिएशनने दिला होता मात्र या प्रकरणी कुठलाही निर्णय न झाल्याने 24 जून रोजी भोकर मोंढा पूर्ण दुकाने बंद ठेवण्यात आले होते त्यामुळे शेतकऱ्यांचीमात्र मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली पेरणीच्या  मोसमाच्या काळात शेतकऱ्यांचे निर्माण झालेली अडचण मात्र कुणीही लक्षात घेतली नाही जोपर्यंत भोकर बाजार समिती यार्डतील भाजीपाला विक्रीचे बीट बंद होणार नाही तोपर्यंत भोकर चा आडत व्यापार बंद ठेवण्यात येईल असा इशारा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रावसाहेब पाटील लामकानी कर व उपाध्यक्ष देवानंद धूत यांनी दिला आहे.
       इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा